Post Office : फिक्स्ड डिपॉझिट हे गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय आहे. जे लोक खात्रीशीर परतावा आणि सुरक्षितता शोधत आहेत त्यांच्यासाठी ही गुंतवणूक सर्वोत्तम पर्याय आहे. बँकांप्रमाणेच पोस्ट ऑफिस देखील गुंतवणूकदारांना टाईम डिपॉझिट स्कीम ऑफर करतात, ज्याला पोस्ट ऑफिस एफडी म्हणतात.
येथे तुम्ही एकरकमी गुंतवणूक करू शकता. पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्कीममध्ये गुंतवणुकीसाठी चार पर्याय उपलब्ध आहेत. 1 वर्ष, 2 वर्षे, 3 वर्षे आणि 5 वर्षे, यावर पोस्ट ऑफिस 6.9 टक्के ते 7.5 टक्के व्याजदर देत आहेत. पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट अंतर्गत जास्तीत जास्त तीन लोकांसह संयुक्त खाते उघडण्याची देखील परवानगी आहे.
तुम्ही पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्कीममध्ये पाच वर्षांसाठी गुंतवणूक केल्यास, तुम्हाला मॅच्युरिटीवर 7.5 टक्के दराने परतावा मिळेल. या योजनेत तुम्हाला किमान 1,000 ची गुंतवणूक करणे आवश्यक आहे.
किती व्याज मिळेल?
पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्कीम अंतर्गत, व्याज वार्षिक उपलब्ध आहे. तुम्ही सध्याच्या 7.5 टक्के व्याजदराने 5 लाख रुपये पाच वर्षांसाठी गुंतवल्यास तुम्हाला 2,24,974 रुपये व्याज मिळेल. मॅच्युरिटीवर तुम्हाला 7,24,974 रुपये मिळतील.
कर लाभ
पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करणारे कर सवलतीसाठी पात्र आहेत. आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत किमान 5 वर्षांसाठी केलेली गुंतवणूक प्रति वर्ष 1.5 लाख रुपयांपर्यंत वजावटीसाठी पात्र आहे. यामुळे कर दायित्व कमी होते. याशिवाय, मॅच्युरिटीनंतर गुंतवणूक खाते वाढवण्याचा पर्याय देखील आहे.
या योजनेत सहा महिन्यांपूर्वी मुदतपूर्व पैसे काढण्याची परवानगी नाही. तुम्ही खाते उघडल्यापासून 6 महिने ते 1 वर्षाच्या दरम्यान खाते बंद करण्याचा निर्णय घेतल्यास, लागू होणारा व्याज दर बचत खात्याच्या बरोबरीने असेल FD योजनेच्या नव्हे.