Post Office : जर तुम्हाला सध्या एफडीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर पोस्ट ऑफिस हा पर्याय तुमच्यासाठी उत्तम असेल. पोस्ट ऑफिस एफडी 1,2,3 आणि 5 वर्षांसाठी चालते. यामध्ये खूप चांगले व्याज उपलब्ध आहेत. आज आपण पोस्ट ऑफिस FD मध्ये 1,00,000 जमा केल्यास, तुम्हाला 1, 2, 3 आणि 5 वर्षांमध्ये किती पैसे परत मिळतील हे जाणून घेणार आहोत.
तुमच्या माहितीसाठी पोस्ट ऑफिसच्या 1 वर्षाच्या एफडीवर सध्या 6.9 टक्के दराने व्याज दिले जाते. तर 2 वर्षाच्या FD वर 7.0 टक्के, 3 वर्षाच्या FD वर 7.1 टक्के आणि 5 वर्षाच्या FD वर 7.5 टक्के व्याज दिले जाते.
5 वर्षांची एफडी केल्याने, तुम्हाला फक्त चांगला व्याज दर मिळत नाही, तर तुम्हाला कर लाभ देखील मिळतात. म्हणून 5 वर्षांच्या एफडीला करमुक्त एफडी म्हणतात. जर तुम्ही पोस्टात एक लाखाची गुंतवणूक 5 वर्षासाठी केली तर तुम्हाला यामध्ये 7.5 टक्के दराने एकूण 44,995 रुपयांचा फायदा होईल. अशाप्रकारे, 5 वर्षानंतर तुम्हाला एकूण 1,44,995 रुपये मॅच्युरिटी रक्कम म्हणून मिळेल.
आणि जर तुम्ही पोस्ट ऑफिस एफडीमध्ये तीन वर्षांसाठी गुंतवणूक केल्यास तुम्हाला 7.1 टक्के दराने व्याज मिळेल. या प्रकरणात, तुम्हाला एकूण 23,508 रुपये व्याज मिळतील आणि मॅच्युरिटीवर तुम्हाला 1,23,508 रुपये मिळतील.
जर तुम्ही दोन वर्षांसाठी पैसे जमा केल्यास तुम्हाला 7 टक्के दराने व्याज मिळेल. या प्रकरणात तुम्हाला एकूण 14,888 रुपये मिळतील. अशा प्रकारे, दोन वर्षांनी तुम्हाला एकूण 1,14,888 रुपये मिळू शकतात.
जर तुम्हाला फक्त एक वर्षासाठी गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला 6.9 टक्के दराने 7,081 रुपये व्याज मिळेल. अशा प्रकारे, एका वर्षानंतर तुम्हाला एकूण 1,07,081 रुपये मिळू शकतात.