ICICI Bank FD Scheme : तुम्हीही नजीकच्या भविष्यात एफडी करण्याच्या तयारीत आहात का मग तुमच्यासाठी नुकतीच एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे. खरे तर देशभरातील विविध बँका आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एफ डी वर चांगले इंटरेस्ट रेट देत आहेत.
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक अर्थातच एसबीआय बँकेपासून ते देशातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक अर्थातच एचडीएफसी बँकेपर्यंत सर्वच बँका आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एफ डी वर चांगले व्याजदर देण्याचा प्रयत्न करत आहेत.
अनेक बँकांनी गेल्या काही महिन्यांच्या कालावधीमध्ये एफडी व्याजदरात सुधारणा देखील केली आहे. अशातच, आता एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
खाजगी क्षेत्रातील भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बँक अर्थातच आयसीआयसीआय बँक ने आपल्या एफ डी व्याजदरात सुधारणा केली आहे. बँकेने 17 जुलै 2024 ला आपले एफ डी वरील इंटरेस्ट रेट रिवाईज केले आहेत.
तसेच हे रिवाईज केलेले दर 17 जुलै पासूनच लागू करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत, आज आपण आयसीआयसीआय बँकेने एफडी व्याजदरात बदल केल्यानंतर बँकेचे नवीन एफ डी रेट कसे आहेत याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
यामुळे जर तुम्हीही येत्या काही दिवसांनी आयसीआयसीआय बँकेत मुदत ठेव करण्याच्या तयारी करत असाल तर आजची ही बातमी तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच वाचायला हवी.
आयसीआयसीआय बँकेचे नवीन एफडी इंटरेस्ट रेट
मिळालेल्या माहितीनुसार, आयसीआयसीआय बँकेने आपल्या सर्वच प्रकारच्या एफडी इंटरेस्ट रेटमध्ये बदल केलेला नाही. बँकेने फक्त तीन कोटी रुपयांपर्यंतच्या एफडी इंटरेस्ट रेट मध्ये बदल केला आहे. हा बदल 17 जुलै 2024 पासून लागू करण्यात आला आहे.
या नवीन बदलानुसार आता या सदर खाजगी क्षेत्रातील बड्या बँकेच्या माध्यमातून आता आपल्या सीनियर सिटीजन ग्राहकांना 7.75% पर्यंतचे व्याज दिले जाणार आहे.
तसेच सामान्य ग्राहकांना आता या बँकेकडून 7.20% पर्यंतचे एफ डी इंटरेस्ट रेट ऑफर केले जाणार आहेत. ही बँक आपल्या ग्राहकांना 15 महिने ते 18 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर सर्वाधिक व्याज ऑफर करत आहे.
या कालावधीच्या एफडीवर आयसीआयसीआय बँकेकडून सामान्य ग्राहकांना 7.20% आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.75% या इंटरेस्ट रेटने परतावा दिला जात आहे. म्हणजे आयसीआयसीआय बँकेत ज्येष्ठ नागरिकांनी गुंतवणूक केल्यास त्यांना सामान्य ग्राहकांपेक्षा अधिकचा परतावा मिळणार आहे.