Fixed Deposit : देशातील दुसऱ्या सर्वात मोठ्या बँकेने आपल्या FD वरील व्याजदरात सुधारणा केली आहे. ICICI बँकेचे नवीन दर 17 जुलै 2024 पासून लागू झाले आहेत. बँकेने हे नवीन दर 3 कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीसाठी लागू आहेत. बँक ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वाधिक 7.75 टक्के व्याज देत आहे. तर सामान्य लोकांसाठी FD वर सर्वाधिक व्याजदर 7.2 टक्के पर्यंत आहे.
आयसीआयसीआय बँक एफडी दर
7 दिवस ते 14 दिवस: सामान्य लोकांसाठी – 3.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 3.50 टक्के
15 दिवस ते 29 दिवस: सामान्य लोकांसाठी – 3.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 3.50 टक्के
30 दिवस ते 45 दिवस: सामान्य लोकांसाठी – 3.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 4.00 टक्के
46 दिवस ते 60 दिवस: सामान्य लोकांसाठी – 4.25 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 4.75 टक्के
61 दिवस ते 90 दिवस: सामान्य लोकांसाठी – 4.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 5.00 टक्के
91 दिवस ते 184 दिवस: सामान्य लोकांसाठी – 4.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 5.25 टक्के
185 दिवस ते 270 दिवस: सामान्य लोकांसाठी – 5.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.25 टक्के
271 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी – 6.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.50 टक्के
एक वर्ष ते 15 महिन्यांपेक्षा कमी: 6.70 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.20 टक्के
15 महिने ते 18 महिन्यांपेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी – 7.20 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.75 टक्के
18 महिने ते 2 वर्षे: सामान्य लोकांसाठी – 7.20 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.70 टक्के
2 वर्षे 1 दिवस ते 3 वर्षे: सामान्य लोकांसाठी – 7.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.50 टक्के
3 वर्षे 1 दिवस ते 5 वर्षे: सामान्य लोकांसाठी – 7.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.50 टक्के
5 वर्षे 1 दिवस ते 10 वर्षे: सामान्य लोकांसाठी – 6.90 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.40 टक्के.
5 वर्षांची कर बचत FD: 7 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.50 टक्के.