आर्थिक

ICICI Bank : ICICI बँकेकडून ग्राहकांना खास भेट, 26,000 पर्यंत मिळेल लाभ, वाचा सविस्तर…

ICICI Bank : सध्या देशभरात सणासुदीचा हंगाम सुरु होत आहे, अशा स्थितीत सर्वत्र ऑफर्स सुरू झाल्या आहेत, शॉपिंग वेबसाईट पासून बँकांपर्यंत सर्वत्र ऑफर्स सुरु झाल्या आहेत. सणासुदीच्या या काळात आता ग्राहकांना खूप मोठा फायदा होणार आहे. काही ई-कॉमर्स कंपन्यांनी आतापसूनच फेस्टिव्ह सेलचे आयोजन केले आहे.

Amazon, Flipkart, Tata New, Myntra इत्यादींच्या विक्रीदरम्यान अनेक आकर्षक ऑफर्स दिल्या जात आहेत. त्याच वेळी, ICICI बँकेने आपल्या ग्राहकांसाठी एक फायद्याचीऑफर आणली आहे. या ऑफर अंतर्गत ग्राहकांना 26 हजार रुपयांपर्यंत सूट आणि कॅशबॅकसह ‘फेस्टिव्ह बोनान्झा’ मिळणार आहे.

ग्राहक ICICI बँक क्रेडिट किंवा डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, रुपे क्रेडिट कार्ड, UPI आणि कार्डलेस EMI वापरून खरेदी करू शकतात. या ऑफरचा वापर ग्राहक बँकेचे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरून नो-कॉस्ट ईएमआय म्हणून देखील करू शकतात. बँक iPhone 15 वर नो-कॉस्ट EMI ची विशेष ऑफर देखील देत आहे.

येथे तुम्हाला सूट मिळेल?

बँक सणासुदीत ग्राहकांना ऑफर, सवलत आणि कॅशबॅक देत आहे. बँकेने ब्रँड आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मसह भागीदारी केली आहे. ICICI बँकेचे कार्यकारी संचालक राकेश झा यांनी सांगितले की, बँक आपल्या ग्राहकांना विशेष ऑफर देत आहे. बँक आपल्या गृह कर्ज, वाहन कर्ज आणि दुचाकी कर्जावर विशेष सणासुदीच्या ऑफर देत आहे.

बँकेने सणासुदीच्या काळात ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल, फॅशन, ज्वेलरी, फर्निचर, प्रवास, खाद्यपदार्थ यांवर अनेक आघाडीच्या ब्रँडसह ऑफर तयार केल्या आहेत. iPhone, MakeMyTrip, Tata New, OnePlus, HP, Microsoft, Croma, Reliance Digital, LG, Sony, Samsung, Tanishq, Taj, Zomato आणि Swiggy वर ऑफर करत आहे.

Sonali Shelar

Published by
Sonali Shelar

Recent Posts