आर्थिक

IDFC First Bank Loan: आयडीएफसी फर्स्ट बँकेकडून घेऊ शकता तुम्ही होमलोन आणि कारलोन! वाचा व्याजदर आणि महत्त्वाची माहिती

IDFC First Bank Loan:- आपण विविध बँका आणि इतर वित्तीय संस्थांच्या माध्यमातून वेगवेगळ्या कामांसाठी किंवा आर्थिक गरजा पूर्ण करण्याकरता वेगवेगळ्या प्रकारचे कर्ज घेत असतो. या कर्जामध्ये बँका किंवा वित्तीय संस्थांचे व्याजदर व नियम वेगवेगळे असतात.

या अनुषंगाने जर आपण आयडीएफसी  फर्स्ट बँकेचा विचार केला तर या बँकेच्या माध्यमातून तुम्ही इन्शुरन्स तसेच विविध प्रकारचे कर्ज, करंट आणि सेविंग अकाउंट, डिपॉझिट तसेच कॅश मॅनेजमेंट सोल्युशन इत्यादी महत्त्वाच्या सुविधा ग्राहकांना दिले जातात.

आयडीएफसी फर्स्ट बँकेची वैशिष्ट्ये म्हणजे 28 प्रकारच्या आवश्यक असलेल्या सेवा झिरो चार्जेस मध्ये ही बँक ग्राहकांना देत असते. या अनुषंगाने महत्त्वाचे असलेल्या या बँकेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या विविध कर्जाचा विचार केला तर आपण या लेखांमध्ये एचडीएफसी फर्स्ट बँकेकडून देण्यात येणारे होम लोन आणि कारलोन याबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत.

 आयडीएफसी फर्स्ट बँक होमलोन

आयडीएफसी फर्स्ट बँक आकर्षक व्याजदरावर तुम्हाला होम लोन देते. या बँकेच्या माध्यमातून तुम्ही पाच कोटी रुपयांपर्यंत होम लोन घेऊ शकतात.याचा परतफेडच्या कालावधी 30 वर्षापर्यंत आहे. विशेष म्हणजे ऑनलाईन पद्धतीने देखील तुम्ही आयडीएफसी फर्स्ट बँकेकडून होम लोन घेऊ  शकतात.

महत्वाचे म्हणजे तुम्हाला जर होम लोन घ्यायचे असेल तर तुम्ही पगारदार असणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे तुम्ही भारताचे नागरिक असले किंवा नसले तरी देखील तुम्ही या बँकेच्या माध्यमातून होम लोन घेऊ शकतात. याकरिता तुमची वयोमर्यादा 21 ते 60 वर्ष पर्यंत असणे गरजेचे आहे.

तसेच तीन वर्षाचा कमीत कमी तुमच्याकडे कामाचा अनुभव असावा. वर्षाला कमीत कमी एक लाख रुपये एवढे उत्पन्न तुमचे असावे. या कर्जाकरिता तुम्हाला बारा महिने ते 360 महिने इतका कालावधी कर्ज परतफेडीसाठी मिळतो.

 आयडीएफसी फर्स्ट बँक कारलोन

आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या माध्यमातून नवीन व जुनी कार घेण्यासाठी देखील कर्ज दिले जाते. कार लोन करिता आयडीएफसी फर्स्ट बँक नऊ टक्के एवढा व्याजदर आकारते व दहा वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्हाला ही कर्ज परतफेड करणे गरजेचे असते. घरच्या ऑन रोड प्राईज च्या शंभर टक्के कर्ज तुम्हाला ही बँक देते.

विशेष म्हणजे कार लोन करिता कुठल्याही प्रकारचे शुल्क आयडीएफसी फर्स्ट बँक आकारत नाही. तुम्हाला हे कर्ज लवकर बंद करायचे असेल तरीदेखील तुम्ही ते करू शकतात.यासाठी तुम्ही ऑनलाईन देखील अर्ज करू शकता व तुम्ही जर या कर्जासाठी पात्र असाल तर आयडीएफसी फर्स्ट बँकेचे एक्झिक्युटिव्ह तुमच्याशी याबाबत संपर्क साधून पुढील प्रक्रिया पूर्ण करतात.

साधारणपणे हे कर्ज मिळवण्याकरिता तुम्हाला पॅन व आधार कार्ड, तुमची सॅलरी स्लिप तसेच फॉर्म 16 किंवा मागच्या वर्षीचा इन्कम टॅक्स रिटर्न, मागील सहा महिन्याचे बँक स्टेटमेंट आणि डीलर कडून आवश्यक कागदपत्र घेणे आवश्यक असते.

या दोन्ही प्रकारच्या कर्जाच्या अधिकच्या माहितीसाठी तुम्ही आयडीएफसी फर्स्ट बँकेशी संपर्क साधू शकतात.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts