Home Loan : होम लोन अर्थातच गृह कर्ज घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी आहे. खरेतर अलीकडे घरांच्या किमती एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत की सर्वसामान्यांना घर घेणे अवघड झाले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये बिल्डिंग मटेरियल, इंधन, मजुरी याचे दर खूपच वाढले आहेत. यामुळे घरांच्या किमती देखील आधीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. म्हणून आता घर बांधणे ही सोपी बाब राहिलेली नाही.
परिणामी आता घराच्या स्वप्नासाठी होमलोनचा आधार घेतला जाऊ लागला आहे. होम लोन घेऊन घर तयार करणे काही अंशी फायदेशीर सुद्धा आहे. रिअल इस्टेट क्षेत्रातील जाणकार लोक देखील सर्वसामान्यांना होम लोन घेऊन घर उभारणीचा सल्ला देत आहेत. दरम्यान आजची ही बातमी अशाच गृह कर्ज घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी खास राहणार आहे.
आज आपण महिन्याचा पगार 40 हजार रुपये असेल तर एचडीएफसी बँकेकडून किती लाखाचे होम लोन मंजूर होऊ शकते याविषयी थोडक्यात माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. एचडीएफसी ही खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. ही बँक 8.50% सुरुवातीच्या व्याजदरात होम लोन उपलब्ध करून देत आहे. ज्या व्यक्तींचा सिबिल स्कोर चांगला असतो त्यांना या व्याज दारात होम लोन उपलब्ध होऊ शकते.
750 पेक्षा अधिक सिबिल स्कोर असलेल्या लोकांना या व्याजदरात होम लोन मिळणार आहे. एचडीएफसी बँक होम लोन कॅल्क्युलेटरनुसार ज्या व्यक्तींचा पगार 40 हजार रुपये प्रति महिना आहे अशा व्यक्तींना 20 लाख 74 हजार 155 रुपयांचे होम लोन 20 वर्षांसाठी मंजूर होऊ शकते.
जर एवढे होम लोन मंजूर झाले तर 18 हजार रुपये प्रति महिना एवढा हप्ता सदर व्यक्तीला भरावा लागू शकतो. 20 लाख 74,155 रुपयांच्या होम लोन साठी 43 लाख 20 हजार रुपये द्यावे लागतील. म्हणजे व्याज म्हणून 22 लाख 45 हजार 845 रुपये द्यावे लागणार आहेत.