Punjab National Bank : जर तुम्ही पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची ठरेल, बँकेने नुकतेच आपल्या एफडीवरील व्याजदरात सुधारणा केली आहे. ज्यामुळे आता ग्राहकांना त्यांच्या गुंतवणुकीवर पूर्वीपेक्षा जास्त फायदा होणार आहे. बँकेने व्याजदर किती टक्क्यांनी वाढवले आहेत हे जाणून घेण्यासाठी बातमी शेवट पर्यंत वाचा.
नुकतेच PNB बँकेने व्याजदरात 80bps म्हणजेच 0.80 टक्के वाढ केली आहे. बँकेच्या वाढीव व्याजदरामुळे, सामान्य लोक, ज्येष्ठ नागरिक आणि अति ज्येष्ठ नागरिकांना FD वर उत्तम लाभ मिळणार आहेत. वाढीव व्याजदरानंतर आता ग्राहकांना एफडीवर ७.८५ टक्के पर्यंत व्याजदर मिळू शकतो. व्याजदरात सुधारणा केल्यानंतर कोणाला किती फायदा होईल जाणून घेऊया…
PNB बँक 1 लाख, 2 लाख आणि 5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर सामान्य लोकांपासून ते अगदी वरिष्ठ लोकांपर्यंत सर्वांना उत्तम परतावा ऑफर करत आहे.
पीएनबीच्या या एफडी स्कीममध्ये सर्वसामान्यांना ७.०५ टक्के दराने व्याज मिळत आहे. जो आधी 6.25 टक्के होता. तर वृद्धांना ७.५५ टक्के व्याज मिळेल. जे आधी 6.75 टक्के होते. बँक सध्या सुपर सिनिअर सिटिझन्सना सर्वाधिक व्याज देत आहे. त्यांना आता 7.85 टक्के दराने व्याज मिळत आहे, जे पूर्वी 7.05 टक्के होते.
तुमच्या माहितीसाठी सामान्य लोकांना यामध्ये 7.05 टक्के व्याज मिळते. तर ज्येष्ठ नागरिकांना ७.५५ टक्के व्याज मिळते. आणि बँक सुपर सीनियरला ७.८५ टक्के व्याज दर ऑफर करत आहे.