आर्थिक

FD Interest Hike : ज्येष्ठ नागरिक असाल तर ‘या’ बँकांमध्ये करा एफडी, मिळेल बक्कळ व्याज!

FD Interest Hike : जर तुमचा सध्या बँकेत एफडी करण्याचा विचार असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आज आम्ही तुम्हाला अशा बँकांबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्हाला इतर बँकांपेक्षा खूप उत्तम परतावा दिला जात आहे. या बँकांमध्ये गुंतवणूक करून तुम्ही काही दिवसातच तुमचे पैसे दुप्पट करू शकाल.

सध्या उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक (SFB), सिटी युनियन बँक, RBL बँक आणि कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक यासह अनेक बँका त्यांच्या एफडीवर भरघोस व्याज देत आहेत. चला एक एक करून या बँकांच्या व्याजदराबद्दल जाणून घेऊया….

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेसाठी मुदत ठेवींचे व्याजदर बदलले आहेत. नवीन दर 1 मे एप्रिल 2024 पासून लागू झाले आहेत. यानुसार, सामान्य नागरिकांसाठी बँकेचा व्याजदर 4 टक्के ते 8.50 टक्के दरम्यान आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी बँकेचे व्याजदर 4.60 टक्के ते 9.10 टक्के दरम्यान आहेत. सर्वाधिक व्याजदर 2 वर्षे ते 3 वर्षे कालावधीच्या FD वर उपलब्ध आहेत. हा व्याजदर 8.50 टक्के ते 9.10 टक्के दरम्यान आहे.

RBL बँक

RBL बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेसाठी मुदत ठेव व्याजदरात बदल केला आहे. नवीन दर 1 मे एप्रिल 2024 पासून लागू झाले आहेत. RBL बँकेने 18 ते 24 महिन्यांच्या FD योजनांसाठी 8 टक्के व्याज दर दिला आहे. त्याच कालावधीच्या FD वर, ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्के अतिरिक्त व्याज मिळते, तर 80 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना 0.75 टक्के अतिरिक्त व्याज मिळते, म्हणजेच त्यांना 8.75 टक्के दराने व्याज मिळेल.

कॅपिटल बँक स्मॉल फायनान्स बँक

कॅपिटल बँक स्मॉल फायनान्स बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेसाठी मुदत ठेव व्याजदरात बदल केला आहे. नवीन दर 6 मे 2024 पासून लागू होतील. बँक सामान्य नागरिकांसाठी 3.5 टक्के ते 7.55 टक्के दरम्यान व्याज दर देत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याज दर 4 टक्के ते 8.05 टक्के दरम्यान आहे. सर्वाधिक व्याज दर 400 दिवसांच्या कालावधीसाठी आहे.

सिटी युनियन बँक

सिटी युनियन बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेसाठी मुदत ठेवींच्या व्याजदरात बदल केला आहे. नवीन दर 6 मे 2024 पासून लागू होतील. बँक सामान्य नागरिकांसाठी 5 टक्के ते 7.25 टक्के दरम्यान व्याज दर देत आहे, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी हा दर 5 टक्के ते 7.75 टक्के दरम्यान आहे. बँक 400 दिवसांच्या FD वर सर्वाधिक व्याज देत आहे.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts