आर्थिक

Fixed Deposit : जेष्ठ नागरिक असाल तर ‘या’ बँकामध्ये करा गुंतवणूक, मिळत आहे सर्वाधिक व्याज…

Fixed Deposit : देशातील सर्वात लोकप्रिय गुंतवणूक पर्याय म्हणजे मुदत ठेव. येथील गुंतवणुकीत कमी जोखीम असल्यामुळे लोकांना येथे गुंतवणूक करायला आवडते. आजही मोठ्या संख्येने लोक एफडी करतात. विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना एफडीमध्ये गुंतवणूक करायला आवडते. बँकाही ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर जास्त व्याज देतात.

अशातच जर तुम्ही एफडी मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार असाल तर आज आम्ही तुम्हाला काही बँकांच्या ऑफर्सबद्दल सांगणार आहोत, जिथे ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक व्याज दिला जात आहे. हे व्याजदर 2 कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीसाठी आहेत.

DCB बँक

DCB बँक ज्येष्ठ नागरिकांसाठी मुदत ठेव (FD) वर 8.6 टक्के व्याज दर देते. हा दर 25 महिने ते 26 महिन्यांच्या मॅच्युरिटी कालावधी असलेल्या FD ला लागू आहे.

IDFC बँक

IDFC फर्स्ट बँक 500 दिवसांत परिपक्व होणाऱ्या FD वर ज्येष्ठ नागरिकांना 8.5 टक्के व्याजदर देत आहे.

बंधन बँक

बंधन बँक एका वर्षात परिपक्व होणाऱ्या FD वर ज्येष्ठ नागरिकांना ८.३५ टक्के व्याजदर देते.

इंडसइंड बँक

IndusInd बँक ज्येष्ठ नागरिकांना एक ते दोन वर्षांच्या कालावधीतील FD वर 8.25 टक्के व्याजदर देत आहे.

येस बँक

येस बँक 18 महिने आणि दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर ज्येष्ठ नागरिकांना 8.25 टक्के व्याज दर देते.

डीबीएस बँक

DBS बँक इंडिया 376 दिवस ते 540 दिवसांच्या दरम्यानच्या मुदतीच्या FD वर ज्येष्ठ नागरिकांना 8 टक्के व्याजदर देते.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts