आर्थिक

SBI Home Loan: एसबीआय कडून 50 लाख रुपयांचे होमलोन 25 वर्षासाठी घेतले तर किती ईएमआय भरावा लागेल? वाचा कॅल्क्युलेशन

SBI Home Loan:- प्रत्येकाला आपल्या हक्काचे स्वतःचे असे घर हवे असते व प्रत्येक जण हे स्वप्न पाहत असतात. आताचे तरुण-तरुणी तर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जेव्हा नोकरी लागते तेव्हा लग्नाच्या अगोदरच भविष्यातील दृष्टिकोनातून स्वतःच्या घराचे स्वप्न बघतात.

परंतु स्वतःचे घर घेणे हे पाहिजे तेवढे सोपे नाही. कारण घरांच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढल्याने  इतक्या मोठ्या प्रमाणावर रक्कम प्रत्येकाकडे असते असे होत नाही. त्यामुळे बऱ्याच व्यक्तींचे घर घेण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहते. परंतु यामध्ये जमेची बाब अशी की, आता घर घेण्यासाठी अनेक बँकांच्या माध्यमातून होमलोनची प्रक्रिया अत्यंत सुलभ आणि सोपी करण्यात आल्यामुळे कोणत्याही बँकेकडून अटी व शर्ती पूर्ण केल्यानंतर ताबडतोब होमलोन मिळते.

यामध्ये अनेक बँकांच्या माध्यमातून होम लोन देण्यात येते व प्रत्येक बॅंकेचे व्याजदरापासून तर अनेक वेगवेगळे नियम असतात व या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा घेतलेल्या होमलोनच्या मासिक हप्त्यावर म्हणजेच ईएमआय वर होत असतो. या अनुषंगाने या लेखामध्ये आपण स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून जर पंचवीस वर्षाच्या कालावधी करिता 50 लाख रुपयांचे होमलोन घेतले तर तुम्हाला महिन्याला किती ईएमआय भरावा लागेल? याबाबतची माहिती बघू.

 एसबीआय कडून 25 वर्षाकरिता 50 लाख रुपये होमलोन घेतल्यावर किती ईएमआय भरावा लागेल?

घर घेण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया 50 लाख रुपयापर्यंत होम लोन देते. स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असून बँकेच्या माध्यमातून सध्या होमलोनवर 9.15 टक्क्यांपासून ते 9.65% पर्यंत व्याजदर आकारला जात आहे. समजा तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून 50 लाख रुपयांचे होमलोन 25 वर्षांच्या कालावधी करिता

घेतले तर 9.15% व्याजदराच्या आधारे तुम्हाला पंचवीस वर्षाच्या कालावधीत घेतलेल्या 50 लाख होमलोनवर मासिक ईएमआय हा 42 हजार 475 रुपये इतका भरावा लागेल. म्हणजे जर आपण कॅल्क्युलेशन बघितले तर घेतलेल्या 50 लाख होमलोनवर तुम्हाला 25 वर्षात बँकेला अतिरिक्त 77 लाख 42 हजार 379 रुपये द्यावे लागतील.

म्हणजे जर आपण घेतलेले कर्ज आणि त्यावरील पंचवीस वर्षाचे व्याज अशी एकंदरीत आकडेवारी पाहिली तर तुम्हाला तुमचे स्वप्नातील घर खरेदी करण्यासाठी एकूण एक कोटी 27 लाख 42 हजार 379 रुपये इतका खर्च करावा लागेल.

 एसबीआय कडून 25 वर्षाकरिता 30 लाख रुपयांचे होमलोन घेतल्यावर किती ईएमआय भरावा लागेल?

समजा तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून तीस लाख रुपये होमलोन 25 वर्षाच्या कालावधी करिता घेतले तर तुम्हाला मासिक ईएमआय हा 9.15% व्याजदराने 25,485 रुपये भरावे लागेल. म्हणजेच पंचवीस वर्षात तुम्हाला तीस लाख रुपयांचे व्याजासह एकूण 46 लाख 45 हजार 427 रुपये बँकेला भरावी लागतील.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts