आर्थिक

Best Investment Options : कमी पगार असेल तर ‘अशा’ पद्धतीने गुंतवा पैसे ! दीड हजारांची बचत तुम्हाला देईल अर्धा कोटी रुपये

Best Investment Options :- आजच्या काळात योग्य ठिकाणची गुंतवणूक करणे अत्यंत गरजेचेच झाले आहे. गुंतवणूक ही कालानुरूप वाढणारी आणि महागाईच्या तुलनेत अथवा त्या पटीत वाढणारी असावी. गुंतवणुकीमधील एक नियम आहे तो म्हणजे तुमच्या कमाईच्या 20 टक्के भाग तुम्ही वाचवला पाहिजे.

गुंतवणूक केली पाहिजे. परंतु सध्या वाढत्या महागाईने 20 टक्के बचत करणे कठीण झाले आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला याठिकाणी काही सोप्या टिप्स सांगणार आहोत की ज्याद्वारे तुम्ही योग्य गुंतवणूक करून लाखो रुपये कमावू शकता.

जर तुम्ही तुमच्या पगारातून 20% पैशांची बचत करू शकत नसाल, तर दरमहा सुमारे 10% गुंतवणूक केल्याने तुम्हाला कालांतराने खूप चांगले रिटर्न मिळतील. जर तुम्ही घरात एकमेव कमावते असाल आणि तुमचा पगार 25 ते 30 हजार रुपयांच्या दरम्यान असेल आणि तुमच्यावर चार जणांचे कुटुंब अवलंबून असेल तर साहजिकच 20 टक्के बचत करणे तुम्हाला जमणार नाही.

पैशांची बचत करण्यात कौटुंबिक गरजाही महत्त्वाची भूमिका बजावतात. समजा तुमच्या कुटुंबाच्या गरजा अधिक असतील, जस औषधें किंवा इतर गोष्टी लागत असतील तर पैसे जास्त खर्च होतात. यामुळे तुमची बचत कमी होऊ शकते.

योग्य गुतंवणूक

तुमच्यामागे कितीही अडचणी असल्या तरी तुम्ही बचत केली पाहिजे. 20% नसेल शक्य तरी तुम्ही तुमच्या पगारातील 5 ते 10 टक्के बचत केली पाहिजे. हे पैसे तुम्ही हाय रिटर्न देणाऱ्या योजनांमध्ये पैसे गुंतवा. असे गृहीत धारा की तुमचा पगार 30000 रुपये आहे.

त्यातील 10 टक्के बचत केली. जर तुम्ही 30 वर्षे सतत गुंतवणूक करत राहिल्यास आणि सरासरी 12 टक्के तुम्हाला रिटर्न मिळत राहिल्यास तुमची एकूण रक्कम अर्थात बचत 1 कोटी 5 लाखांपेक्षा जास्त असेल.

याच तुलनेत दरमहा रु. 1500 वाचवले आणि 30 वर्षे गुंतवणूक करत राहिल्यास आणि 12% रिटर्न मिळाल्यास तुमच्याकडे 50 लाखांपेक्षा जास्त रकमेची बचत होईल. म्हणजे ही छोटी गुंतवणूक तुमच्या भविष्यासाठी मोठा फंड निर्माण करेल.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts