आर्थिक

पोस्ट ऑफिसच्या एफडी स्कीम मध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर 5 वर्षांनी किती रिटर्न मिळणार? पहा संपूर्ण कॅल्क्युलेशन

Post Office FD Scheme : अलीकडे गुंतवणुकीसाठी एफडीला विशेष महत्त्व आले आहे. सुरक्षित गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार पोस्ट ऑफिस अन एलआयसीच्या बचत योजना, बँकेची एफडी योजना, पोस्ट ऑफिसची एफडी योजना, पोस्ट ऑफिसची आरडी योजना इत्यादी ठिकाणी गुंतवणूक करत आहेत. विशेष म्हणजे अलीकडे या योजनांमधून गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न देखील मिळू लागले आहेत.

दरम्यान आज आपण पोस्ट ऑफिस च्या एफडी स्कीम मध्ये गुंतवणुकीवर किती रिटर्न मिळत आहे याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत. पोस्ट ऑफिसच्या टाईम डिपॉझिट स्कीमला अनेकजण एफडी योजना म्हणून ओळखतात. या योजनेमध्ये गुंतवणूकदारांना एक, दोन, तीन आणि पाच वर्षांसाठी एफडी करण्याची सुविधा उपलब्ध होते. या योजनेत किमान एक हजार रुपये गुंतवणूक करता येते.

विशेष म्हणजे या योजनेत गुंतवणुकीची कमाल मर्यादा ठरवण्यात आलेली नाही. गुंतवणूकदार 1000 रुपयाची किमान गुंतवणूक करून नंतर शंभरच्या पटीने गुंतवणुकीची रक्कम वाढवू शकतात. पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून या योजनेअंतर्गत गुंतवणुकीत कालावधीनुसार रिटर्न मिळतं आहेत.

या योजनेत एका वर्षासाठी गुंतवणूक केली तर 6.9 टक्के दराने रिटर्न मिळतात, दोन वर्षाच्या एफडीसाठी सात टक्के दराने रिटर्न मिळतात, तीन वर्षाच्या एफडी साठी 7.1% दराने रिटर्न मिळतात आणि पाच वर्षांच्या एफडीसाठी या योजनेतून 7.5 टक्के दराने रिटर्न मिळतात.

जर पोस्ट ऑफिसच्या टाईम डिपॉझिट योजनेमध्ये अर्थातच फिक्स डिपॉझिटमध्ये एका वर्षासाठी एक लाख रुपयांची गुंतवणूक केली मॅच्युरिटीवर एक लाख 7 हजार 81 रुपये मिळतात. जर दोन वर्षासाठी या योजनेत एक लाख रुपये गुंतवले तर मॅच्युरिटीवर एक लाख 14 हजार 888 रुपये मिळतात. या योजनेत तीन वर्षांसाठी एक लाख रुपये गुंतवले तर मॅच्युरिटीवर एक लाख 23 हजार 508 रुपये मिळतात. तसेच 5 वर्षांसाठी या योजनेत एक लाख रुपये गुंतवले तर मॅच्युरिटीवर 1 लाख 44 हजार 995 रुपये मिळतात.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts