आर्थिक

Post office : दरमहा नियमित पेन्शन हवी असेल तर पोस्टाच्या ‘या’ योजनेत करा गुंतवणूक; मिळेल जबरदस्त व्याज…

Post office : पोस्ट ऑफिसकडून ग्राहकांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. अशीच एक योजना म्हणजे पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना. या योजनेअंतर्गत ग्राहकांना दरमहा पेन्शनचा लाभ दिला जातो. या योजनेत फक्त एकदाच गुंतवणूक करावी लागते आणि याचा लाभ तुम्ही आयुष्यभर घेऊ शकता.

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना (POMIS) ही एक अतिशय प्रसिद्ध आणि लोकप्रिय गुंतवणूक योजना आहे ज्यामध्ये गुंतवणूकदारांना 5 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागते, या योजनेत गुंतवणूकदारांच्या ठेवींवर दरमहा आकर्षक व्याजाचा लाभ मिळतो. या योजनेत किमान 1000 रुपयांची गुंतवणूक केली जाऊ शकते आणि ही गुंतवणूक सिंगल खाते किंवा संयुक्त खात्याच्या स्वरूपात केली जाऊ शकते.

तुम्ही या योजनेत खाते उघडल्यास, तुम्ही त्यात 9 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता, तर तुम्ही संयुक्त खाते उघडल्यास, तुम्ही 15 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. POMIS अंतर्गत गुंतवणूक करून, गुंतवणूकदारांना दरमहा 7.4 टक्के व्याजाचा लाभ मिळतो. ही योजना त्यांच्यासाठी अत्यंत योग्य आहे जे गुंतवणुकीसाठी सुरक्षित आणि स्थिर पर्याय शोधत आहेत.

या योजनेत प्री-मॅच्युरिटी पर्याय देखील उपलब्ध आहे, ज्या अंतर्गत गुंतवणूकदार पहिल्या वर्षापासूनच गुंतवणूकीची रक्कम काढू शकतात, परंतु यासाठी काही अटींचे पालन करावे लागेल.

या योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी हे लक्षात ठेवावे की ही योजना पोस्ट ऑफिसद्वारे ऑफर केलेल्या इतर गुंतवणूक योजनांपेक्षा वेगळी आहे. या योजनेत तुम्ही तुमच्या आर्थिक योजनेनुसार गुंतवणूक करू शकता, आणि दरमहा पेन्शन स्वरूपात या गुंतवणीवर मिळणाऱ्या व्याजाचा लाभ घेऊ शकता.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts