आर्थिक

SIP Investment : करोडपती बनायचे असेल तर गुंतवणुकीचा ‘हा’ सोपा फंडा वापरा !

SIP Investment : जेव्हा-जेव्हा लोक गुंतवणूकीचा विचार करतात तेव्हा मोठा परतावा मिळवण्याचे ध्येय समोर ठेवतात. बरेच लोक त्यांच्या उत्पन्नाचा काही भाग बचत म्हणून गुंतवतात पण निश्चित परताव्याचे लक्ष्य फार कमी लोक गाठतात.

पण जर तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीद्वारे करोडपती व्हायचे असेल तर आज आम्ही तुम्हाला SIP च्या माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून करोडपती बनण्याचे काही नियम सांगणार आहोत. याचा अवलंब करून तुम्ही तुमचे रिटर्न टार्गेट साध्य करू शकता.

सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट पॉलिसी म्हणजेच एसआयपी (म्युच्युअल फंड एसआयपी) येथे गुंतवणूक करून, तुम्ही दीर्घ मुदतीत चांगले परतावा देखील मिळवू शकता. यामध्ये एफडी किंवा बँकेत केलेल्या इतर योजनांपेक्षा अधिक व्याज मिळतात. कारण SIP मध्ये तुम्हाला चक्रवाढ परतावा मिळतो. ज्या कालावधीत तुम्हाला लक्षाधीश व्हायचे आहे त्यासाठी तुम्ही किती गुंतवणूक करू इच्छिता यावर अवलंबून आहे.

तुम्ही दरमहा तुमच्या उत्पन्नातून दहा हजार रुपये SIP मध्ये गुंतवलेत तर सुमारे वीस वर्षांनी तुम्ही करोडपती होऊ शकता. ही रक्कम दरमहा वीस हजार झाली, तर अवघ्या पंधरा वर्षांत तुम्हाला करोडो रुपयांचा निधी जमवता येईल. जर तुम्ही दर महिन्याला 25000 ची SIP करत असाल तर तुम्हाला करोडपती होण्यासाठी सुमारे 13 वर्षे लागतील.

जर तुमचे उत्पन्न चांगले असेल. म्हणजेच, सर्व खर्च केल्यानंतरही, तुमच्याकडे किमान ५० हजार रुपये शिल्लक राहिल्यास, त्यातील ४० हजार रुपयांची एसआयपी करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. असे केल्याने तुम्ही अवघ्या दहा वर्षांत चक्रवाढ परतावा मिळवून करोडपती होऊ शकता.

पाच वर्षांतही करोडो रुपयांचा परतावा मिळू शकतो

तुम्ही दर महिन्याला 1 लाख रुपयांची SIP करत असाल तर फक्त पाच वर्षात तुमचे 1 कोटी रुपये जमा होतील. उत्पन्न मिळवणे सोपे आहे, परंतु ते योग्य वेळी योग्य योजनेत गुंतवणे फार महत्वाचे आहे. ज्यांना योग्य वेळी गुंतवणूक आणि त्याचे फायदे माहित आहेत ते गुंतवणूक करण्यास सुरवात करतात आणि भविष्यात त्याचा फायदा घेतात.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts