Home Loan Offer : सध्या स्वतःचे घर घेणे खूप महागडे झाले आहे. आज कोणत्याही सामान्य व्यक्तीला स्वतःचे घर घेणे शक्य नाही, अशास्थितीत लोक आपल्या आयुष्याची सर्व कमाई खर्च करतात किंवा गृहकर्जाची मदत घेतात. पण सध्या कर्जाचे व्याजदर देखील गगनाला भिडले आहेत.
अशातच तुम्ही सध्या घर घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला अगदी विचारपूर्वक पाऊल उचलावे लागेल. पण देशात अशाही काही बँका आहेत, ज्या कमी व्यजदरात गृहकर्ज ऑफर करत आहेत. कोणत्या आहेत त्या बँका पाहूया…
पीएनबी बँक
पीएनबी बँक 30 लाख ते 75 लाख रुपयांपर्यंतचे अर्ज 8.45 टक्के ते 10.25 टक्के दराने देत आहे. जर ग्राहकाचा CIBIL स्कोर बरोबर असेल तर त्याला अत्यंत कमी व्याजदराने गृहकर्ज मिळू शकते.
SBI बँक
यानंतर SBI लोकांना स्वस्त दरात गृहकर्ज देत आहे. बँकेचा गृहकर्जाचा व्याजदर वार्षिक 8.40 टक्के आहे. ग्राहक 30 वर्षांसाठी कर्ज भरण्याचा पर्याय निवडू शकतात. याशिवाय बँक महिलांना ०.०५ टक्के कमी व्याजदराने कर्ज देते.
बँक ऑफ इंडियाचा
बँक ऑफ इंडिया सर्वात स्वस्त दरात गृहकर्ज देत आहे. बँक ऑफ इंडियाचा व्याजदर वार्षिक 8.30 टक्के आहे. ग्राहक मालमत्ता मूल्याच्या 90 टक्के पर्यंत कर्ज घेऊ शकतात. यामध्ये 30 वर्षांपर्यंतचे पेमेंट पर्याय उपलब्ध आहे. याशिवाय, बँक गृहकर्ज घेणाऱ्यांना ओव्हरड्राफ्ट सुविधा पुरवते.
ICICI बँक
ICICI बँक ग्राहकांना 35 ते 75 लाख रुपयांपर्यंतचे गृहकर्ज 9.5 टक्के ते 9.8 टक्के दराने देत आहे. यात 75 लाखांपेक्षा जास्त कर्जावर जास्त व्याज द्यावे लागते.
बँक ऑफ बडोदा गृह कर्ज
तर बँक ऑफ बडोदा लोकांना 8.40 टक्के ते 10.60 टक्के व्याजदराने गृहकर्ज देत आहे. ज्यांचे CIBIL स्कोअर चांगले आहे त्यांना बँक कमी व्याजदराने कर्ज देते.
एचडीएफसी बँक
यानंतर देशातील सर्वात मोठी खासगी बँक HDFC बँक ग्राहकांना 30 लाख ते 75 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज 8.35 व्याजदरात देत आहे.