FD Rate Hike : एफडी ज्येष्ठ नागरिकांमध्ये प्रसिद्ध आहे, जी त्यांना आपत्कालीन निधी तयार करण्यात आणि बचत करण्यास मदत करते. FD तरलता प्रदान करते आणि नियमित व्याज उत्पन्न देखील देते. एफडीवरील व्याज करपात्र आहे.
सध्या खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षांच्या एफडीवर 7.75 टक्के व्याज देत आहेत. आज आपण अशा दहा बँकांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या तीन वर्षांच्या FD वर आकर्षक व्याज देत आहेत. येथे आपण 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षांच्या एफडीवर मिळणाऱ्या व्याजाबद्दल जाणून घेणार आहोत.
बँक ऑफ बडोदा
ज्येष्ठ नागरिकांसाठी तीन वर्षांच्या एफडीवर व्याजदरः 7.75 टक्के
तीन वर्षांसाठी गुंतवलेली 1 लाख रुपयाची रक्कम 1.26 लाख रुपये होईल.
ॲक्सिस बँक
ज्येष्ठ नागरिकांसाठी तीन वर्षांच्या एफडीवर व्याजदरः 7.60 टक्के
तीन वर्षांसाठी गुंतवलेली 1 रुपयाची रक्कम 1.25 लाख रुपये होईल.
एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि पंजाब नॅशनल बँक
ज्येष्ठ नागरिकांसाठी तीन वर्षांच्या एफडीवर व्याजदरः 7.50 टक्के
येथे तीन वर्षांसाठी गुंतवलेली 1 लाख रक्कम 1.25 लाख रुपये होईल.
कॅनरा बँक
ज्येष्ठ नागरिकांसाठी तीन वर्षांच्या एफडीवर व्याजदरः 7.30 टक्के
येथे तीन वर्षांसाठी गुंतवलेली 1 लाख रुपयाची रक्कम 1.24 लाख रुपये होईल.
स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ इंडिया
ज्येष्ठ नागरिकांसाठी तीन वर्षांच्या एफडीवर व्याजदरः 7.25 टक्के.
येथे तीन वर्षांसाठी गुंतवलेली 1 लाख रुपयाची रक्कम 1.24 लाख रुपये होईल.
युनियन बँक ऑफ इंडिया
ज्येष्ठ नागरिकांसाठी तीन वर्षांच्या एफडीवर व्याजदरः 7 टक्के.
येथे तीन वर्षांसाठी गुंतवलेली 1 लाख रुपयाची 1.23 लाख रुपये होईल.
इंडियन बँक
ज्येष्ठ नागरिकांसाठी तीन वर्षांच्या FD वर व्याजदर: 6.75 टक्के
येथे तीन वर्षांसाठी गुंतवलेली 1 लाख रुपयाची रक्कम 1.22 लाख रुपये होईल.