Special FD Offer:- 2024 हे वर्ष आता संपायला फक्त काही दिवस शिल्लक राहिले असून त्यानंतर 2025 या नवीन वर्षाचे आगमन होईल. परंतु या सरत्या वर्षाच्या शेवटी जर तुम्हाला मुदत ठेव म्हणजेच एफडी करून अधिक व्याजाचा लाभ मिळवायचा असेल तर तुम्ही आयडीबीआय आणि पंजाब आणि सिंध बँक यांच्या विषयी एफडी ऑफरचा लाभ घेऊ शकतात.
परंतु या दोन्ही बँकांच्या विशेष ऑफरचा लाभ घेण्याची शेवटची मुदत म्हणजेच या एफडी योजनेमध्ये गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2024 आहे.
त्यामुळे तुम्हाला जर कमी वेळेमध्ये एफडीमध्ये गुंतवणूक करून जास्त पैसे कमवायचे असतील तर ही एक सुवर्णसंधी आहे. या अनुषंगाने या लेखामध्ये आपण या दोन्ही बँकांच्या या खास असलेल्या एफडी ऑफरविषयी माहिती जाणून घेऊ.
आयडीबीआय बँक विशेष एफडी ऑफर
आयडीबीआय बँकेची विशेष एफडी उत्सव ही योजना 300 दिवस, 375 दिवस, 444 आणि 700 दिवसांची आहे व यामध्ये तुम्ही 31 डिसेंबर 2024 पर्यंत गुंतवणूक करू शकतात. सर्वसामान्य ग्राहकांना तीनशे दिवसाच्या एफडीवर या ऑफर अंतर्गत 7.5%, 375 दिवसांच्या एफडीवर 7.25%,444 दिवसांच्या एफडीवर 7.35% आणि 700 दिवसांच्या एफडीवर 7.20 टक्के व्याज मिळत आहे.
महत्वाची आहे आयडीबीआय बँकेची उत्सव विशेष चारशे दिवसांची एफडी योजना
तसेच आयडीबीआय बँक आता नियमित ग्राहक तसेच एनआरआय आणि एनआरओ ग्राहकांना 444 दिवसांच्या एफडीवर 7.85% व्याज देत असून जे पूर्वी 7.25 टक्के होते.
या एफडी योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे ही मुदतपूर्वी देखील तुम्हाला बंद करता येते. तसेच आयडीबीआय बँक 375 दिवसांच्या उत्सव एफडीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्के व्याज देत असून नियमित ग्राहक तसेच एनआरआय आणि एनआरओ ग्राहकांना 375 दिवसांच्या एफडीवर 7.25 टक्के व्याज देत आहे. आयडीबीआय बँकेच्या माध्यमातून या एफडीमध्ये मुदतपूर्वी पैसे काढणे किंवा पैसे बंद करण्याचा पर्याय देखील देते.
आयडीबीआय उत्सव 300 दिवसांची एफडी योजना
आयडीबीआय बँक तीनशे दिवसांच्या उत्सव एफडी योजनेमध्ये देखील एक गुंतवणूक करण्याची उत्तम संधी देत असून यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना तीनशे दिवसांच्या एफडीवर 7.55% व्याज मिळते तर त्याचवेळी नियमित ग्राहकांनी जर 300 दिवसांची एफडी केली तर त्यांना 7.5% व्याज मिळत आहे.
पंजाब आणि सिंध बँकेची विशेष एफडी
आयडीबीआय बँकेसोबतच पंजाब आणि सिंध बँक देखील अनेक विशेष एफडी योजना ऑफर करत असून या बँकेच्या एफडीमध्ये गुंतवणूक करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2024 आहे.
ही बँक 222 दिवसांच्या एफडीवर 6.30%, 333 दिवसांच्या एफडीवर 7.20%, 444 दिवसांच्या एफडीवर 7.30%, 555 दिवसांच्या एफडीवर 7.45%, 777 दिवसांच्या एफडीवर 7.25% आणि 999 दिवसांच्या एफडीवर 6.65 टक्के व्याज देत आहे.