Cibil Score Maintain Tips:- तुम्ही कोणत्याही बँकेत किंवा वित्तीय संस्थेमध्ये कर्ज घ्यायला गेलात व तुम्हाला कोणत्याही प्रकारचे कर्ज घ्यायचे असेल तर सगळ्यात आधी बँक किंवा वित्तीय संस्थांच्या माध्यमातून सगळ्यात अगोदर फक्त एकच गोष्ट पाहिली जाते व ती म्हणजे तुमचा क्रेडिट स्कोर अर्थात सिबिल स्कोर होय.
आपल्याला माहित आहे की,तुमचा क्रेडिट इतिहास किंवा तुमचे व्यवहार कशा पद्धतीचा आहे? हे सिबिल स्कोरच्या माध्यमातून दर्शवले जाते व त्यानंतर बँक तुम्हाला कर्ज द्यायचे की नाही याबाबतचा निर्णय घेत असते. त्यामुळे तुमचा सिबिल स्कोर उत्तम राहील या दृष्टिकोनातून तुमचे प्रयत्न असणे खूप गरजेचे आहे.
परंतु बऱ्याचदा आपल्याच काही चुका नडतात व सिबिल स्कोर घसरतो. अशावेळी मात्र तुम्हाला कोणत्याही प्रकारचे कर्ज घ्यायचे राहिले तरी देखील तुम्हाला कर्ज मिळणे जवळपास अशक्य होते व मिळालेच तरी व्याजदर जास्त असतो. त्यामुळे सिबिल स्कोर उत्तम ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी? त्याबद्दलची थोडक्यात माहिती बघू.
या गोष्टींची काळजी घ्या व सिबिल स्कोर उत्तम ठेवा
1- क्रेडिट कार्डचा वापर अशा पद्धतीने करा- समजा तुम्ही जर क्रेडिट कार्ड वापरत असाल तर त्याचा अतिवापर करणे टाळा. तुम्ही जर क्रेडिट कार्डचा जास्त प्रमाणात वापर करत असाल तर हे एक क्रेडिट स्कोर घसरण्यामागील प्रमुख कारण असू शकते. साधारणपणे तुमच्या क्रेडिट कार्डला जो काही लिमिट दिलेला असेल
त्या लिमिटच्या दहा ते पंधरा टक्के क्रेडिट वापरणे हे एक चांगले लक्षण समजले जाते किंवा जास्तीत जास्त 30 टक्के पेक्षा जास्त खर्च क्रेडिट कार्ड वरून करू नये. उदाहरणच घ्यायचे झाले तर तुमचा क्रेडिट कार्डची मर्यादा एक लाख 50 हजार रुपये असेल तर तुम्ही त्यापैकी फक्त प्रत्येक महिन्याला 45 हजार रुपये पेक्षा जास्त खर्च करूच नये.
2- क्रेडिट रिपोर्ट रेगुलरली तपासा- बऱ्याचदा आपल्याला जे आपल्या क्रेडिट स्कोर विषयी रिपोर्ट मिळतात ते शंभर टक्के अचूक असतीलच असे नाही. यामध्ये काही चुका असू शकतात व ते तुमच्या आर्थिक वर्तणुकीबद्दल चुकीची माहिती देऊ शकतात.
त्यामुळे तुम्ही क्रेडिट कार्डचा अहवाल म्हणजे सिबिल स्कोर रिपोर्ट नियमितपणे तपासणे आणि काही चुका जर राहिल्या तर त्या दुरुस्त करण्याला प्राधान्य द्यावे. जेणेकरून तुमचा सिबिल स्कोर उत्तम राहील.
3- कर्जाचे नियोजन- तुम्हाला जर तुमची क्रेडिट प्रोफाइल संतुलित पद्धतीचे ठेवायचे असेल तर यामध्ये सिक्युअर्ड आणि अन सिक्युअर्ड म्हणजे सुरक्षित आणि असुरक्षित असे दोन्ही प्रकारचे कर्ज असावेत.
तुम्ही जर वैयक्तिक कर्ज म्हणजेच पर्सनल लोन किंवा क्रेडिट कार्ड सारख्या प्रकारच्या कर्जावर अवलंबून असाल तर हे तुमच्या क्रेडिट स्कोरमध्ये समस्या निर्माण करू शकते. त्यामुळे गोल्ड लोन सारख्या सुरक्षित कर्जाचा समावेश तुम्ही तुमच्या कर्जामध्ये करावा.
4- अनेक कर्जासाठी अर्ज करणे टाळा- कमी कालावधीमध्ये एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड किंवा कर्जाकरिता तुम्ही अर्ज करणे टाळा. जर अशा पद्धतीने एकापेक्षा जास्त आणि कमी कालावधीमध्ये कर्जासाठी अर्ज करत असाल
तर तुमच्या क्रेडिट रिपोर्टवर इन्क्वायरी वाढू शकते व त्यामुळे देखील तुमचा क्रेडिट अर्थात सिबिलवर विपरीत परिणाम होतो. या माध्यमातून तुम्हाला कर्जाची किंवा क्रेडिटची जास्त गरज असल्याचा मेसेज संबंधित संस्थांना मिळतो.
5- जुनी क्रेडिट खाते बंद करणे टाळा- बऱ्याचदा अनेकजण जुने क्रेडिट कार्ड जर असतील तर ते बंद करण्याला प्राधान्य देतात व बंद करतात. परंतु यामुळे देखील तुमचा सिबिल स्कोर खराब होण्याची शक्यता वाढते.
याचा अर्थ असा होतो की तुमच्याकडे जर जुने क्रेडिट कार्ड असेल तर तुम्ही बऱ्याच काळापासून क्रेडिटचे म्हणजेच व्यवहाराचे मॅनेजमेंट चांगले करत आहात असा त्याचा अर्थ होतो व त्यामुळे तुम्हाला फायदा होतो.
नकारात्मक रेकॉर्डचा प्रभाव सिबिल स्कोरवर किती वर्षापर्यंत टिकू शकतो?
तुमचा क्रेडिट अर्थात सिबिल रेकॉर्ड खराब असेल आणि आता तुम्ही सध्या सर्व पेमेंट जरी वेळेवर करत असाल तरी देखील निगेटिव्ह इम्पॅक्ट हा जवळपास सात वर्षापर्यंत तुमच्या क्रेडिट स्कोरवर दिसून येतो व त्यामुळे तुम्ही सिबिल स्कोर उत्तम पद्धतीने टिकवून ठेवणे खूप गरजेचे असते.