आर्थिक

फिक्स डिपॉझिट मधील गुंतवणूक फायदेशीर बनवायची असेल तर ‘या’ 4 गोष्टींवर ठेवा लक्ष! रहाल मोठ्या फायद्यात

Tips Of Investment In FD:- फिक्स डिपॉझिट म्हणजे मुदत ठेव हा गुंतवणुकीचा सर्वात विश्वासार्ह असा प्रकार असून मोठ्या प्रमाणावर बँकांमध्ये एफडी करण्यावर गुंतवणूकदारांचा भर आपल्याला दिसून येतो. यामागील जर आपण प्रमुख कारणांचा शोध घेतला तर प्रमुख्याने एफडी मध्ये केलेली गुंतवणुक सुरक्षित असते व निश्चित असा परतावा आपल्याला मिळत असतो.

आपल्याला माहित आहे की विविध बँकांच्या माध्यमातून अनेक आकर्षक अशा एफडी योजना ऑफर केल्या जातात व एफडी म्हणजेच मुदत ठेव ठेवण्याचा जो काही कालावधी आहे त्यानुसार वेगवेगळा व्याजदर दिला जातो.

तसेच सामान्य नागरिकांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांना अधिकचा व्याजदर प्रत्येक बँक ही देत असते. परंतु एफडी करायची असेल तर त्यामध्ये पैसे गुंतवण्याआधी काही गोष्टींची काळजी घेणे देखील तितकेच गरजेचे असते. नाहीतर फायदा होणे दूरच राहते व नाहकच मानसिक त्रासाला सामोरे जाण्याची शक्यता वाढते.

एफडीत गुंतवणूक करा परंतु या चार गोष्टी अगोदर लक्षात ठेवा

1- तुमच्या जवळील सर्व पैसे एकाच एफडीमध्ये गुंतवू नका- फिक्स डिपॉझिट म्हणजेच एफडी करण्याआधी या गोष्टीची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. समजा तुमच्याकडे जर दहा लाख रुपये असतील व तुम्हाला ते एफडीमध्ये गुंतवायचे असतील तर पूर्ण दहा लाख रुपये एकाच एफडीमध्ये न गुंतवता

ते प्रत्येकी एक लाख रुपयांच्या नऊ एफडी आणि 50 हजाराच्या दोन एफडी अशाप्रकारे गुंतवावे व एका बँकेत न गुंतवता जास्तीत जास्त बँकांमध्ये गुंतवावेत.म्हणजेच तुम्हाला जर मध्येच पैशांची गरज भासली तर तुम्ही तुमची गरज पाहून एफडी मध्येच तोडून पैशांची व्यवस्था करू शकतात व बाकीच्या एफडी तुमच्या सुरक्षित राहतात.

2- व्याज काढणे किंवा विड्रॉल करणे- एफडीवर मिळणारे व्याज काढायचे की नाही काढायचे हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून असते. अगोदर बँक तीन महिन्याने आणि वार्षिक आधारावर व्याज काढण्याची मुभा देत होते.

रंतु आता काही बँकांमध्ये महिन्याला तुम्ही व्याजाचे पैसे काढू शकतात. त्यामुळे तुम्ही एफडी करताना तुमची गरज काय आहे त्यानुसार व्याज काढण्याचा पर्याय निवडू शकतात.

3- एफडीवर कर्ज घेण्याअगोदर व्याजदर तपासा- तुम्हाला माहित असेलच की तुम्ही जे काही एफडी करता त्यावर तुम्हाला कर्ज देखील मिळू शकते. या कर्जाच्या पर्यायामध्ये तुम्ही जितकी एफडी केली असेल त्या एफडीच्या मूल्याच्या 90% पर्यंत कर्ज तुम्हाला मिळू शकते.

म्हणजेच एक लाख रुपयाची तुमची एफडी असेल तर तुम्हाला 90 हजार रुपयापर्यंत कर्ज मिळू शकते. तुम्ही जर एफडीवर कर्ज घेतले तर तुम्हाला केलेल्या एफडीवर जो काही व्याजदर मिळत आहे त्यापेक्षा एक ते दोन टक्क्यांपेक्षा जास्त व्याज द्यावे लागते.

हे जर आपण उदाहरणाने समजून घेतले तर समजा तुम्हाला एफडीवर पाच टक्के व्याज मिळत आहे आणि त्याच एफडीवर जर तुम्ही कर्ज घेतले तर तुम्हाला घेतलेल्या कर्जाकरिता सात ते आठ टक्के व्याजदर बँकेला द्यावा लागू शकतो. त्यामुळे ही देखील काळजी घेणे खूप गरजेचे आहे.

4- ज्येष्ठ नागरिकांना मिळते अधिक व्याज- बऱ्याच बँका ज्येष्ठ नागरिकांनी जर एफडी केली तर त्यांना 0.50% पर्यंत जास्त व्याज देतात. त्यामुळे तुम्हाला जर एफडी करायची असेल आणि तुमच्या घरामध्ये जर ज्येष्ठ नागरिक असतील तर तुम्ही त्यांच्या नावावर एफडी करून जास्त व्याजाचा फायदा मिळवू शकतात व चांगला नफा देखील मिळवू शकतात.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts