DA Hike News : देशातील लाखो कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी केंद्रातील केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खास आहे. खरंतर गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशात केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यापासून चार टक्के डीएवाडीचा लाभ मिळेल अशी बातमी वेगाने पसरत होती. अनेक वृत्त संस्थांनी कर्मचाऱ्यांना चार टक्के डीएवाडीचा लाभ मिळणार असे सांगितले होते.
मात्र आता महागाई भत्ता वाढीबाबत एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. मात्र हे अपडेट कर्मचाऱ्यांची निराशा करणारे आहे. खरंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना DA चार टक्के वाढेल अशी आशा वाटतं होती. मात्र आता ही आशा फोल ठरली असून महागाई भत्त्यात वाढ होणार आहे मात्र चार टक्के वाढ न होता अवघा तीन टक्के महागाई भत्ता वाढणार असल्याचे सांगितले जात आहे.
सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 42 टक्के एवढा असून आता यामध्ये तीन टक्के वाढ होणार असल्याची शक्यता पाहता महागाई भत्ता 45% एवढा होणार आहे. याचा लाभ जुलै महिन्यापासून संबंधित कर्मचाऱ्यांना मिळणार असून याची घोषणा या चालू महिन्यात किंवा सप्टेंबर महिन्यात होऊ शकते असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे. म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यापासूनची महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील दिली जाणार आहे.
महागाई भत्ता वाढ कशी ठरली
आम्ही आपणास सांगू इच्छितो की कर्मचाऱ्यांना ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारे महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जातो. वर्षातून दोनदा ही वाढ लागू केली जाते. जानेवारी महिन्यापासून आणि जुलै महिन्यापासून अशी दोनदा वाढ कर्मचाऱ्यांना बहाल केली जाते.
दरम्यान 31 जुलै 2023 रोजी केंद्र सरकारच्या AICPA – IW ची आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीनुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये जुलै महिन्यापासून तीन टक्के एवढी वाढ करण्यात येणार आहे.
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारे सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तांमध्ये 3.23 % टक्के वाढ होणे अपेक्षित होते. मात्र या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी ती म्हणजे तीन टक्के वरील दशांश अंकाचा विचार महागाई भत्ता वाढ लागू करताना केला जाणार नाहीये.
म्हणजे महागाई भत्ता हा केवळ 3 टक्केच निश्चित केला जाणार आहे. दरम्यान येत्या काही दिवसात याचा प्रस्ताव तयार होणार असून हा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळात मंजुरीसाठी ठेवला जाणार असल्याची माहिती मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे.