HDFC Bank : जर तुम्ही एचडीएफसी ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर आहे. बँकेने नुकतेच आपले एफडीवरील व्याजदर वाढवले आहेत. हे नवे वाढलेले दर आजपासून लागू झाले आहेत. या अंतर्गत बँकेत एफडी करणाऱ्या ग्राहकांना आता पूर्वीपेक्षा जास्त 7.75 टक्के पर्यंत उत्कृष्ट व्याज मिळणार आहेत.
तुमच्या माहितीसाठी बँकेने हे व्याजदर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर दिले आहेत. सध्या HDFC बँकेने त्यांच्या FD दरात 0.25 टक्के वाढ केली आहे. बँक सामान्य गुंतवणूकदारांना 18 महिने ते 21 महिन्यांच्या एफडीवर जास्तीत जास्त 7.25 टक्के व्याज देत आहे. याच कालावधीसाठी वृद्धांना ७.७५ टक्के व्याज दिले जात आहे.
सामान्य गुंतवणूकदारांना 5 वर्षे, 1 दिवस ते 10 वर्षांपर्यंतच्या FD वर जास्तीत जास्त 7 टक्के व्याज मिळत आहे आणि ज्येष्ठ नागरिकांना त्याच कालावधीसाठी 7.75 टक्के व्याज दिले जात आहे. बँक जेष्ठ नागरिकांना अतिरिक्त व्याजदर ऑफर करत आहे.
बँकेच्या वेबसाइटनुसार, या बँकेत 7 दिवसांपासून ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी एफडीची सुविधा आहे. HDFC बँक 7 दिवस ते 10 वर्षांच्या FD वर 3.5 टक्के ते 7.75 टक्के व्याज देत आहे.
तर 18 महिन्यांपासून 21 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी बँक 7.25 टक्के व्याज देत आहे. बँकेच्या इतर कालावधीच्या एफडीसंबंधित माहिती मिळवण्यासाठी तुम्ही बँकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.