PPF Investment : PPF खातेधारकांसाठी महत्वाची बातमी आहे. गुंतवणूकदारांना चालू आर्थिक वर्ष, 2024-25 साठी भविष्य निर्वाह निधी (PPF) खात्यात 5 एप्रिलपूर्वी पैसे जमा करावे लागतील अन्यथा त्यांना मोठ्या नुकसानीला समोरे जावे लागू शकते.
PPF खातेधारकांना 5 एप्रिलपूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा अधिक फायदा होऊ शकतो. PPF योजनेनुसार, PPF खात्यातील व्याज दर महिन्याच्या 5 तारखेपासून ते महिन्याच्या अखेरीस PPF खात्यातील सर्वात कमी शिल्लकीच्या आधारावर मोजले जाते. त्यामुळे पीपीएफमध्ये गुंतवणूक करणारे लोक आर्थिक वर्षासाठी एकरकमी पेमेंट करत असतील तर कमाई वाढवण्यासाठी ते 5 एप्रिलपूर्वी भरले पाहिजे.
5 तारखेपूर्वी गुंतवणूक करण्याचा फायदा
जर एखाद्या PPF खातेदाराने 5 एप्रिलपूर्वी गुंतवणूक केली तर त्याला त्याच रकमेवर अधिक व्याज मिळू शकते. म्हणजेच 6 एप्रिलला तेवढीच रक्कम जमा केल्यास तुम्हाला कमी व्याज मिळेल.
जर तुम्ही एकाच वेळी संपूर्ण वर्षासाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला त्या रकमेवरील एका महिन्याच्या व्याजाइतके नुकसान होईल.
कारण, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजनेच्या नियमांनुसार, PPF खात्यातील व्याज दर महिन्याच्या 5 तारखेपासून ते महिन्याच्या अखेरीस खात्यातील सर्वात कमी शिल्लक रकमेच्या आधारावर मोजले जाते.
सध्या पीपीएफ खात्यावर सरकार 7.1 टक्के दराने व्याज देते आहे. जर एखाद्या व्यक्तीने प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेपर्यंत गुंतवणूक केली तर त्याला जमा केलेल्या रकमेवर पूर्ण व्याजाचा लाभ मिळतो. आणि जर त्याने उशिरा रक्कम भरली तर त्याला नुकसान होऊ शकते.
उदारणार्थ
जर तुम्ही या आर्थिक वर्षात 5 एप्रिलपर्यंत एकरकमी रक्कम 15 वर्षांच्या कालावधीसाठी 1.5 लाख रुपये जमा केले तर त्याला 18.18 लाख रुपयांचे व्याज मिळेल.
त्याच वेळी, पीपीएफ खातेधारकाने 5 एप्रिलनंतर पैसे जमा केल्यास, त्याला फक्त 15.84 लाख रुपये व्याज मिळतील. अशास्थितीत PPF खातेधारकाला 15 वर्षांच्या कालावधीत 2.69 लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागेल.