आर्थिक

अवघ्या दोन वर्षात अकाउंटला असतील एक लाख रुपये ! पोस्टासह म्युच्युअल फंडच्या ‘या’ आहेत हाय रिटर्न देणाऱ्या स्कीम

Mutual Funds : पैसे कुणाला नको असतात. आज प्रत्येक जण आपल्या अकाउंटला एखादा मोठा फंड राखीव असावा अशा विचारात नेहमी असतो. परंतु काही खर्च किंवा महागाई पाहता बऱ्याच हे शक्य होत नाही.

परंतु तुम्ही जर योग्य गुंतवणुकीचा मार्ग जर निवडला तर तुम्ही आरामात अगदी कमी दिवसात एक लाखांचा फंड तुमच्या अकाउंटला जमा करूशकता. पहिल्या पगारातच तुम्हाला याचे नियोजन करावे लागेल. येथे तुम्हाला बँक, पोस्ट हे पर्याय आहेत.

परंतु यात एक लाखाचा फंड व्हायला साधारण चार वर्षांचा कालावधी लागेल. कमी गुंतवणुकीत 1 लाख रुपयांचा फंड तुम्हाला दोन वर्षांत करायचा असेल तर म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे योग्य ठरेल.

यात तुम्ही अवघे 1200 रुपयांच्या मासिक गुंतवणुकीने लाखभर रुपयांचा फंड उभा करू शकता. चला गणित जाणून घेऊयात –

पोस्टाच्या आरडीमध्ये पाच वर्ष करावी लागेल गुंतवणूक –

तुम्हाला यात पाच वर्षांसाठी दरमहा 1400 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. सध्या यावर 6.7 टक्के व्याजदर मिळत आहे. पाच वर्षात तुमचा एक लाखाचा फंड तयार होईल.

 म्युचअल फंडात साधारण २ वर्षात होईल एक लाखाचा फंड

म्युच्युअल फंडातील गुंतवणूक रिस्की असते. पण रिटर्न खूप चांगले असतात. परतावा खूप चांगला आहे. म्युच्युअल फंडाच्या अनेक शानदार स्कीम आहेत. यामध्ये वार्षिक सरासरी 12 टक्के परतावा मिळतो.

म्युच्युअल फंडात 2 वर्षात 1 लाख

तुम्हाला महिन्याला 3700 रुपये 2 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागेल. तुम्हाला 12 टक्के पर्यंत रिटर्न जर मिळाला तर 2 वर्षात एक लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा होईल.

म्युच्युअल फंडाचा 3 वर्षाचा प्लॅन

तुम्हाला महिन्याला 2300 रुपये 3 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागेल. तुम्हाला 12 टक्के पर्यंत रिटर्न जर मिळाला तर 3 वर्षात एक लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा होईल.

– सर्वात जास्त रिटर्न देणारे टॉप 5 म्युच्युअल फंड

– यात पहिल्या क्रमांकावर आहे क्वांट स्मॉल कॅप म्युच्युअल फंड. यामध्ये 5 वर्षांत दरवर्षी 33.68 टक्के इतका रिटर्न मिळाला आहे.

– रिटर्न देणाऱ्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे क्वांट इन्फ्रास्ट्रक्चर म्युच्युअल फंड. यामध्ये 5 वर्षांत दरवर्षी 31.86 टक्के इतका रिटर्न मिळाला आहे.

– आता टॉप फाईव्ह मध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे क्वांट मिड कॅप म्युच्युअल फंड. यामध्ये 5 वर्षांत दरवर्षी 29.41 टक्के इतका रिटर्न मिळाला आहे.

-निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप म्युच्युअल फंड हा चौथ्या क्रमांकावर आहे. यामध्ये 5 वर्षांत दरवर्षी 29.32 टक्के रिटर्न मिळाला आहे.

– अॅक्सिस स्मॉल कॅप म्युच्युअल फंड टॉप फाईव्ह मध्ये येतो पाचव्या क्रमांकावर. यात 28.40 टक्के रिटर्न मिळाला आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office
Tags: Mutual Funds

Recent Posts