आर्थिक

Post Office : पोस्ट ऑफिसच्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दुप्पट परतावा, फक्त एकदाच करा गुंतवणूक!

Post Office : दीर्घकालीन गुंतवणूक हा नेहमीच चांगला पर्याय मानला जातो. यामध्ये गुंतवलेल्या रकमेवर तुम्हाला चांगला परतावा मिळतो. तुम्ही दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी चांगल्या सरकारी योजनेचा विचार करत असाल तर किसान विकास पत्र (KVP) हा एक चांगला पर्याय आहे. दीर्घकालीन गुंतवणूक करून तुम्ही तुमची रक्कम दुप्पट करू शकता. ही पोस्ट ऑफिस स्कीम आहे, म्हणजेच त्याचा लाभ घेण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडावे लागेल.

खाते कोण उघडू शकते?

ही योजना 1988 मध्ये सुरू झाली. सुरुवातीला ही योजना फक्त शेतकऱ्यांसाठी होती, मात्र आता कोणताही भारतीय नागरिक या योजनेत खाते उघडू शकतो. या योजनेअंतर्गत एकल किंवा संयुक्त खाते उघडता येते. जर मुलाचे वय 10 ते 18 वर्षे दरम्यान असेल, तर त्याच्या नावावर KVP योजनेत खाते उघडले जाऊ शकते. मात्र, अशा मुलांचे खाते सांभाळणे ही पालकांची जबाबदारी आहे. वयाची १८ वर्षे पूर्ण केल्यानंतर, व्यक्ती स्वतः खाते वापरू शकतो.

सध्या या योजनेत ७.५ टक्के दराने व्याज दिले जात आहे. मात्र, हे व्याज दर तीन महिन्यांनी मोजले जाते. अशा परिस्थितीत बदल होऊ शकतो. सध्याचा व्याजदर सप्टेंबरपर्यंत राहील. त्यात काही बदल झाला तर तो ऑक्टोबरपासून होईल.

या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला निश्चित व्याजानुसार परतावा मिळतो. अशा स्थितीत बाजारातील चढउतारांमुळे त्यात काही फरक पडत नाही. याचा अर्थ, आपण असे म्हणू शकतो की त्यात गुंतवणूक करणे जोखीममुक्त आहे.

यामध्ये तुम्ही एक हजार रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. जास्तीत जास्त गुंतवणुकीवर मर्यादा नाही. मात्र, तुम्ही ५० हजार रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केल्यास पॅनकार्ड देणे आवश्यक आहे. तुम्ही 10 लाख रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केल्यास तुम्हाला सॅलरी स्लिप, आयटीआर, बँक स्टेटमेंट इत्यादी प्रदान करावे लागतील.

5 लाखांवरून 10 लाख रुपये कसे मिळवायचे?

या योजनेचा परिपक्वता कालावधी 115 महिने (9 वर्षे 7 महिने) आहे. तुम्ही यामध्ये 5 लाख रुपये गुंतवल्यास ही रक्कम 115 महिन्यांनंतर दुप्पट होईल. म्हणजे तुमचे 5 लाख रुपये गुंतवलेले रुपये 10 लाख होतील. त्याचा लॉकइन कालावधी 30 महिने आहे. या वेळेपूर्वी तुम्ही रक्कम काढू शकत नाही. यानंतर तुम्ही ही रक्कम काढू शकता. 30 महिन्यांनंतर, जेव्हाही तुम्ही रक्कम काढाल तेव्हा तुम्हाला त्या कालावधीसाठी व्याज लागू केल्यानंतर रक्कम मिळेल. या योजनेतील गुंतवणुकीवर प्राप्तिकराच्या कलम 80C चा लाभ मिळत नाही.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts