Indian Railways : बस किंवा इतर वाहनांपेक्षा रेल्वेचे तिकीट खूप स्वस्त असते. त्यामुळे अनेक प्रवासी रेल्वेने प्रवास करत असतात. प्रवाशांच्या हितासाठी भारतीय रेल्वे अनेक सुविधा उपलब्ध करून देत असते. परंतु अनेक प्रवाशांना या नियमांबद्दल कसलीच माहिती नसते.
जर तुम्हाला रेल्वेने प्रवास करायचा असेल तर तुमच्याकडे रेल्वेचे तिकीट असणे खूप महत्त्वाचे आहे, त्याशिवाय तुम्हाला प्रवास करता येत नाही. जर तुम्ही रेल्वेत तिकिटाशिवाय पकडला गेला तर तुम्हाला दंड भरावा लागतो. त्यामुळे तिकीट काढूनच प्रवास करावा.
अनेकांना प्रयत्न करूनही भारतीय रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळत नाही, त्यामुळे त्यांना मनस्ताप सहन करावा लागतो. महत्त्वाच्या प्रसंगी तर पहिली डोकेदुखी नेहमीच रेल्वेचे तिकीट असते.
उपलब्ध करून दिली ही सुविधा
आता एक चांगली सुविधा भारतीय रेल्वेकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. समजा तुम्हाला अनेक महिन्यांपूर्वी मोठ्या कष्टाने कन्फर्म तिकीट मिळाले असल्यास ज्या दिवशी तुम्ही प्रवास करणार असाल त्या दिवशीचे काही कारणास्तव तुम्हाला तुमचे तिकीट रद्द करावे लागले किंवा ट्रान्सफर करावे लागले,नंतर तुम्हाला थोडा वेळ थांबावे लागणार आहे. परंतु या कटकटीतून तुम्ही वाचू शकता.
जर तुमचे तिकीट रद्द करण्याच्या आणि वेगळ्या तारखेसाठी दुसरे तिकीट मिळवण्याच्या त्रासातून जाण्यापेक्षा आता तुम्हाला तुमचे कन्फर्म केलेले तिकीट दुसर्या तारखेला परत शेड्यूल करता येऊ शकते. परंतु अनेकांना याबद्दल माहिती नाही.
असे करा तिकिट शेड्यूल
समजा तुम्ही ऑफलाइन तिकीट बुक केले असल्यास तर तुम्हाला प्रस्थानाच्या कमीत कमी 48 तास अगोदर तुम्हाला स्टेशनवर जावे लागणार आहे. तेथे वेळेत आरक्षण काउंटरला भेट देऊन फी भरल्यानंतरच तिकीट पुन्हा शेड्यूल करता येईल.
प्रवशांनो हे लक्षात घ्या की ही सुविधा केवळ ऑफलाइन बुकिंगसाठी उपलब्ध असून समजा जर तुम्ही तुमचे तिकीट ऑफलाइन बुक केले असेल तर तुम्हाला ट्रेन सुटण्याच्या कमीत कमी 48 तास अगोदर आरक्षण कार्यालयात जावे लागणार आहे.
हे समजून घ्या की तिकीट पुन्हा शेड्यूल करण्यासाठी तुम्हाला निर्गमन स्टेशनला भेट द्यावी लागणार आहे. त्याशिवाय विशेष तिकिटांवर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली नाही.