IndusInd Bank : जर तुम्ही इंडसइंड बँकेचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. बँकेने आपल्या FD व्याजदरात कपात करून ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. बँकेने आपल्या 2 कोटी रुपयांपेक्षा कमी FD व्याजदरात बदल केले आहेत. नवीन व्याजदर 5 ऑगस्ट 2023 पासून लागू झाले आहेत. इंडसइंड बँकेने त्यांच्या एफडी दरात 0.25 टक्क्यांनी कपात केली आहे.
या आठवड्यात व्याजदरांचा आढावा घेण्यासाठी आरबीआयची बैठक सुरु आहे, अशा वेळी बँकेने ही कपात केली आहे. बँकेने केलेल्या या कपातीनंतर ग्राहक नाराज झाले आहेत. आता FD वर ग्राहकांना जास्तीत जास्त 7.5 टक्के व्याज मिळेल.
इंडसइंड बँकेचे नवीन व्याजदर :-
-7 ते 30 दिवसांत परिपक्व होणाऱ्या FD वर व्याज – 3.50 टक्के
-31 ते 45 दिवसांत परिपक्व होणाऱ्या FD वर व्याज – 3.75 टक्के
-46 ते 60 दिवसांत परिपक्व होणाऱ्या FD वर व्याज – 4.25 टक्के
-61 ते 90 दिवसांत परिपक्व होणाऱ्या FD वर व्याज – 4.60 टक्के
-91 ते 120 दिवसांत परिपक्व होणाऱ्या FD वर व्याज – 4.75 टक्के
-121 ते 180 दिवसांत परिपक्व होणाऱ्या FD वर व्याज – 5 टक्के
181 ते 210 दिवसांत परिपक्व होणाऱ्या FD वर व्याज – 5.85 टक्के
-211 ते 269 दिवसांत परिपक्व होणाऱ्या FD वर व्याज – 6.1 टक्के
-270 ते 354 दिवसांत परिपक्व होणाऱ्या FD वर व्याज – 6.35 टक्के
-355 ते 364 दिवसांत परिपक्व होणाऱ्या FD वर व्याज – 6.35 टक्के
-1 वर्ष ते 1 वर्ष 6 महिन्यांत परिपक्व होणाऱ्या FD वर व्याज – 7.5 टक्के
-1 वर्ष ते 6 महिने ते 2 वर्षांपर्यंत परिपक्व होणाऱ्या FD वर व्याज – 7.5 टक्के
-2 वर्षे ते 3 वर्षांच्या FD वर व्याज – 7.50 टक्के
-3 वर्षे ते 61 महिन्यांच्या FD वर व्याज – 7.25 टक्के
-5 वर्षांच्या एफडीवर व्याज – 7.25 टक्के
चलनविषयक धोरण समितीची बैठक :-
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या चलनविषयक धोरण समितीची बैठक मंगळवारी (8 ऑगस्ट) सुरू झाली आहे. ही बैठक सध्या सुरू आहे. 10 ऑगस्ट रोजी सकाळी RBI गव्हर्नर शक्तीकांत दास हे चलनविषयक धोरण जाहीर करतील. त्याच वेळी, आरबीआयच्या घोषणेपूर्वी, देशातील सर्वात मोठ्या खाजगी क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या इंडसइंड बँकेने कपातीचा निर्णय घेतला आहे.