Instant Loan:- बऱ्याच जणांना अनेक वेळा आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते व पैशांची गरज भासते. जास्त करून हॉस्पिटलची परिस्थिती म्हणजे वैद्यकीय आपत्कालीन स्थिती उद्भवली तर अशा परिस्थितीमध्ये व्यक्तीला अनिश्चित अशा खर्चाला सामोरे जावे लागते व त्यामुळे पैसे नसले तर खूप मोठी धांदल उडते. अशा अचानकपणे उद्भवलेल्या पैशांच्या समस्यामुळे पटकन पैसे मिळणे किंवा पैशांची तजवीज होणे कठीण होऊन बसते.
समजा तुम्हाला अशा परिस्थितीमध्ये जर बँकेकडून पर्सनल लोन वगैरे घ्यायचे असेल तर त्याची एक प्रक्रिया असते व यासाठी खूप मोठा कालावधी लागू शकतो व आपत्कालीन परिस्थितीमध्ये हे आपल्याला योग्य ठरत नाही. या तुलनेमध्ये तुम्ही जर इन्स्टंट लोनचा पर्याय अवलंबला तर तो तुमच्यासाठी फायद्याचा ठरू शकतो.
परंतु यामध्ये देखील काही गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे असते. परंतु आपत्कालीन अशा पैशांच्या गरजेमध्ये इन्स्टंट लोनचा पर्याय हा नक्कीच फायद्याचा आहे. इन्स्टंट लोनच्या बाबतीत पाहिलं तर या माध्यमातून अनेक वित्तपुरवठादार असून ते तुम्हाला अडचणीच्या काळामध्ये झटक्यात कर्ज सुविधा देऊ शकतात. यामध्ये आपण उदाहरण घेतले तर बजाज फायनान्स या वित्तपुरवठादाराचे उदाहरण घेता येईल. अनपेक्षितरित्या उद्धवलेल्या खर्चाकरिता हा पर्याय उत्तम ठरू शकतो.
बजाज फिन्सर्वकडून इन्स्टंट लोन कसे मिळवायचे?
1- याकरता तुम्हाला बजाज फिन्सर्व संकेतस्थळावर जाऊन इन्स्टा पर्सनल लोन या पेजवर यावे लागेल.
2- त्यानंतर चेक ऑफर या बटनावर क्लिक करावे व क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी ऑनलाइन अर्ज उघडतो.
3- तुमची प्रोफाइल ची निश्चिती किंवा खात्री पटवण्याकरिता तुमचा दहा आकडी मोबाईल क्रमांक आणि त्यावर आलेला ओटीपी नमूद करावा लागतो.
4- तुम्ही जर बजाजचे विद्यमान ग्राहक असेल तर तुमच्याकरिता फ्री अप्रुव म्हणजे पूर्व संमत करण्यात आलेली कर्ज मर्यादेची ऑफर तुम्हाला मोबाईलच्या स्क्रीनवर दिसते. यामध्ये तुम्ही ही ऑफर स्वीकारू शकता किंवा तुमच्या आवडीनुसार यामध्ये रक्कम टाकू शकतात.
5- विशेष म्हणजे याकरिता तुम्हाला सुलभ असा कर्ज भरणा कालावधी निवडता येतो.
6- ऑनलाइन अर्ज पूर्ण करण्यासाठी तुम्हाला प्रोसेस वर क्लिक करावे लागेल.
विद्यमान ग्राहकांसाठी कशी आहे कर्ज मिळण्याची पद्धत?
जर तुम्ही अगोदरच बजाज फायनान्सचे ग्राहक असतील तर तुम्हाला प्री अप्रुड ऑफर म्हणजेच पूर्व मंजूर ऑफर आलेली असते. त्यामुळे तुमची कर्जासाठी पात्रता तपासण्याची गरज राहत नाही. त्यामध्ये काही विद्यमान ग्राहकांना उत्पन्नाचा पुरावा देण्याची देखील गरज भासत नाही. तसेच काही विद्यमान ग्राहकांना बँकेचे स्टेटमेंट आणि केवायसी इत्यादी सारख्या कमीत कमी कागदपत्रांची मागणी केली जाऊ शकते.
नवीन ग्राहकांसाठी कशी आहे प्रक्रिया?
बजाज फायनान्स इन्स्टा पर्सनल लोन सुविधा मिळवण्याकरिता तुम्ही बजाज फायनान्सचे ग्राहक म्हणजेच विद्यमान ग्राहक असण्याची देखील पूर्व अट नाही. तुम्हाला जर इन्स्टंट पर्सनल लोन ऑफर तपासायची असेल तर त्याकरिता फक्त एक मोबाईल नंबर आणि त्यावर पाठवलेला ओटीपी गरजेचं असतो. परंतु काही प्रकरणांमध्ये नवीन ग्राहकांना पडताळणी करिता काही कागदपत्रे सादर करणे गरजेचे असते.
इन्स्टा पर्सनल लोनचा ईएमआय कसा निश्चित केला जातो?
तुमचा आर्थिक बजेटला शक्य होईल अशी कर्जाची रक्कम निश्चित करण्याकरिता इन्स्टा पर्सनल लोन ईएमआय कॅल्क्युलेटर वापरणे गरजेचे आहे. यामुळे तुम्हाला ईएमआय आणि तुमची कर्ज परतफेडीची क्षमता इत्यादी नुसार तुम्हाला अनुकूल कर्ज परतफेडीचा कालावधी निश्चित करण्यास मदत होते.
जर तुम्ही कर्ज परतफेडचा कालावधी वाढवला तर तुम्हाला मासिक ईएमआय कमी बसतो आणि कालावधी कमी घेतला तरी ईएमआय वाढतो. ईएमआय कॅल्क्युलेटर मुळे तुम्हाला मुद्दल आणि व्याजाचे डिटेल्समध्ये माहिती मिळण्यास देखील मदत होते. बजाज फायनान्स इन्स्टा पर्सनल लोन ग्राहकांच्या अनपेक्षितपणे उद्भवलेल्या आर्थिक परिस्थितीतील पैशांची गरज हाताळण्यासाठी एक विश्वासार्ह असा प्लॅटफॉर्म आहे.
या माध्यमातून कर्जाची रक्कम मिळण्यासाठी 30 मिनिट ते चार तासांचा कालावधी लागू शकतो आणि 6 ते 63 महिन्यापर्यंतच्या कालावधीत तुम्हाला त्या कर्जाची परतफेड करता येऊ शकते.
( वरील लेख हा माहितीस्तव असून अशा प्रकारची कोणत्याही प्रकारची कर्ज घेताना तुम्ही तुमच्या पातळीवर योग्य ती काळजी आणि माहिती घेणे गरजेचे आहे.)