आर्थिक

Interest Rates : गुंतवणुकीची उत्तम संधी! ‘या’ ठिकाणी मिळत आहे FD पेक्षा जास्त व्याज

Interest Rates : आपल्या चांगल्या भविष्यासाठी अनेक वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करत आहेत. परंतु या प्रत्येक योजनांमध्ये वेगवेगळे व्याजदर मिळत असल्याने परतावाही वेगवेगळा असतो. जर तुम्ही जास्त परतावा देणाऱ्या योजनेत गुंतवणूक केली तर तुम्हाला त्याचा फायदा होतो.

परंतु जर तुम्ही कमी परतावा देणाऱ्या योजनेत गुंतवणूक केली तर तुम्हाला कमी परतावा मिळेल. अनेकजण FD मध्ये गुंतवणूक करतात. परंतु काही अशा बँक आहेत ज्यात तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला FD पेक्षा जास्त परतावा मिळेल.

जन स्मॉल फायनान्स बँक

सर्वात अगोदर आता जन स्मॉल फायनान्स बँकेबद्दल जाणून घेऊयात. यामध्ये बँक आपल्या आपल्या ग्राहकांना गुंतवणुकीवर एकूण 3.50% ते 7.50% पर्यंत व्याज देत आहे. इतकेच नाही तर बँक 10 कोटी ते 50 कोटी रुपयांच्या ठेवींवर सर्वात जास्त व्याज देत आहे.

युनिटी स्मॉल फायनान्स बँक

त्यानंतर आता युनिटी स्मॉल फायनान्स बँक बचत खात्यावर ६ ते ७ टक्के इतके व्याज देत आहे. ही बँकेकडून आपल्या ग्राहकांच्या 1 लाख रुपयांच्या ठेवींवर 6 टक्के आणि रुपये पेक्षा जास्त ठेवींवर 7 टक्के इतक्या दराने व्याज देण्यात येत आहे.

उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक

इतकेच नाही तर आता उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेकडून आपल्या ग्राहकांना बचत खात्यावर एकूण 3.50 ते 7.50 टक्क्यांपर्यंत दराने व्याज दिले जात आहे.

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक

आता सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक आपल्या ग्राहकांना बचत खात्यात एकूण 3.75% ते 7% पर्यंत व्याज देत आहे. अशा प्रकारे जर तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला खूप मोठा नफा मिळू शकतो.

इक्विटी स्मॉल सेव्हिंग्ज

इक्विटी स्मॉल सेव्हिंग्जकडून आपल्या ग्राहकांना 1 लाख रुपयांच्या शिल्लक रकमेवर 3.50% व्याज दिले जात आहे. तुम्हाला आता 1 लाख रुपये, 5 लाख शिल्लक वर 5.25 टक्के दराने व्याज दिले जाईल. तर दुसरीकडे, 5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 5 कोटी रुपयांच्या रकमेवर एकूण 7 टक्के दराने तर 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेवर 7.50 टक्के दराने व्याज देण्यात येत आहे. त्यामुळे आत्ताच आपले पैसे गुंतवा.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts