अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2022 Maharashtra News:- रशिया युक्रेन युद्धामुळे (Russia-Ukraine War) कच्च तेलाच्या किमतींनी उच्चांक घातला आहे. आंतराराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमती प्रति बॅरल 130 वर जाऊन पोहोचली आहे. त्यामुळे पेट्रोल (Petrol) डिझेल (Disel) चे भाव (Rate) वाढण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कच्चा तेलाच्या किमतींचा २००८ नंतरचा उच्चांक आहे. १४ वर्षांची सर्वोच्च पातळी गाठल्यानंतरही आज (बुधवारी) ९ मार्च २०२२ रोजी देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत.
भारतीय तेल कंपन्यांनी त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर ९ मार्चसाठी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अपडेट केल्या आहेत. राष्ट्रीय बाजारात आजही तेलाच्या किमती स्थिर आहेत, मात्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर वाहनांच्या इंधनाच्या किमती वाढतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
रॉयटर्सच्या मते, सोमवारी सुरुवातीच्या व्यापारात ब्रेंट क्रूडची (Crude Oil) किंमत ९.९% च्या वाढीसह प्रति बॅरल $ १३० ओलांडली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत विक्रमी वाढ होऊनही देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती मध्ये नोव्हेंबर २०२१ पासून कोणताही बदल झालेला नाही.
मार्च महिन्यातच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर १२ ते १५ रुपयांनी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
पेट्रोल डिझेल चे आजचे दर
दिल्लीतील इंडियन ऑइल पंपावर आज, ०९ मार्च रोजी पेट्रोलचा दर ९५.४१ रुपये प्रति लिटर तर डिझेलचा दर ८६.६७ रुपये प्रति लिटर आहे. तर नोएडा मध्ये पेट्रोल ९५.५१ प्रति लिटर इतका आहे तर डिझेलचा दार प्रति लिटर ८७.०१ इतका आहे.
शहर पेट्रोल डिझेल
दिल्ली 95.4 86.67
मुंबई 109.98 94.14
कोलकाता 104.67 89.79
चेन्नई 101.40 91.43