Post office : पोस्ट ऑफिसकडे देशातील सर्व नागरिकांसाठी योजना आहेत. जर तुम्ही देखील सुरक्षित आणि जास्त परताव्याची योजना शोधत असाल तर पोस्ट ऑफिस तुमच्यासाठी एका पेक्षा एक योजना ऑफर करते. आज आपण पोस्टाच्या अशा एका योजनेबद्दल जाणून घेणार आहोत ज्यात तुम्हाला मासिक उत्पन्नाची हमी मिळते.
आम्ही पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेबद्दल बोलत आहोत, (POMIS) ही एक अतिशय प्रसिद्ध आणि लोकप्रिय गुंतवणूक योजना आहे ज्यामध्ये गुंतवणूकदारांना 5 वर्षांसाठी गुंतवणूक करायची आहे, या गुंतवणुकीत तुम्हाला दरमहा आकर्षक व्याज मिळते.
या योजनेत किमान 1000 रुपयांपासून गुंतवणूक केली जाऊ शकते आणि पोस्टाच्या या योजनेत सिंगल खाते किंवा संयुक्त खाते उघडण्याची मुभा आहे. तुम्ही एकल खाते उघडले तर त्यात 9 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता, आणि जर तुम्ही संयुक्त खाते उघडले तर, तुम्ही 15 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता.
POMIS अंतर्गत गुंतवणूक करून, गुंतवणूकदारांना दरमहा 7.4 टक्के व्याज मिळते, इतर कोणत्याही योजनेत इतके व्याज दिले जात नाहीत, अशास्थितीत तुमच्याकडे चांगली कमाई करण्याची संधी आहे. ही योजना त्यांच्यासाठी अत्यंत योग्य आहे जे गुंतवणुकीसाठी सुरक्षित आणि स्थिर पर्याय शोधत आहेत.
या योजनेत प्री-मॅच्युरिटी पर्याय देखील उपलब्ध आहे, ज्या अंतर्गत गुंतवणूकदार पहिल्या वर्षापासूनच गुंतवणूकीची रक्कम काढू शकतात, परंतु यासाठी काही अटींचे पालन करावे लागेल.
या योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी हे लक्षात ठेवावे की ही योजना पोस्ट ऑफिसद्वारे ऑफर केलेल्या इतर गुंतवणूक योजनांपेक्षा वेगळी आहे. आणि त्यांनी त्यांच्या आर्थिक योजनेनुसार गुंतवणूक करावी.