Post Office Saving Schemes : सर्वसाधारणपणे, लोक मुदत ठेवींसाठी बँकांकडे वळतात. परंतु जर तुम्हाला दीर्घ मुदतीची एफडी करायची असेल आणि उत्तम परतावा देखील हवा असेल तर पोस्ट ऑफिस तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. पोस्ट ऑफिस एफडीला टाइम डिपॉझिट म्हणून देखील ओळखले जाते. येथे तुम्हाला 1, 2, 3 आणि 5 वर्षांचे FD पर्याय मिळतात. येथे कालावधी नुसार वेगवेगळे व्याजदर दिले जातात.
अशातच पोस्ट ऑफिस 5 वर्षांच्या करमुक्त एफडीवर खूप चांगले व्याज देते. जर तुम्ही या योजनेत पैसे गुंतवले तर तुम्हाला ते काही वर्षांत दुप्पट होऊन मिळतात. पोस्ट ऑफिस एफडीचे व्याजदर काय आहेत आणि त्याद्वारे तुम्ही दुप्पट रक्कम कशी मिळवू शकता? जाणून घ्या…
दोन वर्षांच्या एफडीवर – 7.0 टक्के वार्षिक व्याज
तीन वर्षांच्या एफडीवर र – 7.1 टक्के वार्षिक व्याज
पाच वर्षांच्या खात्यावर व्याज – 7.5 टक्के वार्षिक व्याज
जर तुम्हाला पोस्टाच्या या योजनेतून दुप्पट परतावा हवा असेल तर तुम्हाला सर्वप्रथम 5 वर्षांसाठी 5 लाख रुपयांची एफडी करावी लागेल. आणि 5 वर्षांनंतर, तुम्हाला आणखी पुढील 5 वर्षांसाठी ही वाढवावी लागेल. अशा प्रकारे तुमच्या FD चा कार्यकाळ 10 वर्षांचा असेल. तुम्ही या 10 वर्षांत 5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 10,51,175 रुपये मिळवू शकता.
जेव्हा तुम्ही पोस्ट ऑफिस FD मध्ये 5 वर्षांसाठी 5 लाख रुपये जमा करता, तेव्हा पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट कॅल्क्युलेटरनुसार, तुम्हाला 7.5 टक्के व्याज दराने 2,24,974 रुपये व्याज म्हणून मिळतील. म्हणजे 5 वर्षांनंतर तुम्हाला ही रक्कम 7,24,974 रुपये मिळेल.
परंतु जेव्हा तुम्ही ही रक्कम पुढील 5 वर्षांसाठी पुन्हा निश्चित करता तेव्हा तुम्हाला 7.5 टक्के व्याजदराने 3,26,201 रुपये व्याज म्हणून मिळतील. जर 7,24,974 रुपये 3,26,201 मध्ये जोडले तर एकूण 10,51,175 रुपये होतील. अशा प्रकारे तुम्हाला मॅच्युरिटीवर 10,51,175 मिळतील.