SBI Special FD Scheme:- गुंतवणुकीसाठी मुदत ठेव योजना म्हणजेच एफडीला खूप प्राधान्य दिले जाते व गुंतवणूक सुरक्षित राहण्याच्या दृष्टिकोनातून व चांगला परतावा मिळवण्यासाठी एफडी योजना खूप फायद्याच्या ठरतात.यामध्ये जर आपण बघितले तर जवळपास सर्वच बँकांच्या माध्यमातून एफडी योजना राबवल्या जातात व यामध्ये देशातील महत्त्वाच्या असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून देखील विविध वैशिष्ट्य असलेल्या एफडी योजना राबवल्या जात आहेत.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या दृष्टिकोनातून बघितले तर या बँकेने आपल्या ग्राहकांना आकर्षक परतावा देण्याकरिता 444 दिवसांच्या कालावधीची एसबीआय अमृत वृष्टी योजना सादर केली आहे व ही एक विशेष मुदत ठेव योजना असून ती 16 जुलै 2024 ला लॉन्च करण्यात आली होती
व आता गुंतवणूकदारांना या योजनेतून गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवायचा असेल तर ही संधी 31 मार्च 2025 पर्यंत असणार आहे.
म्हणजे या तारखेपर्यंत या योजनेत अर्ज करून गुंतवणूक करता येणार आहे. या योजनेचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये केलेल्या एफडीवर चांगला व्याजदर मिळतो व त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये ही योजना कमी वेळेत लोकप्रिय झाली आहे.
कसे आहे एसबीआयच्या विशेष एफडी योजनेचे स्वरूप?
एसबीआयची ही विशेष एफडी योजना अशा गुंतवणूकदारांसाठी खास डिझाईन करण्यात आले आहे.ज्यांना कमीत कमी कालावधीत चांगला परतावा मिळवायचा आहे.
या योजनेअंतर्गत केलेल्या एफडीवर सर्वसामान्य ग्राहकांना सध्या 7.25% वार्षिक व्याजदर दिला जात आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्के वार्षिक व्याजदराचा फायदा मिळणार आहे. विशेष म्हणजे एसबीआयची ही योजना देशातील ग्राहकांसाठी आहेच.परंतु एनआरआय ग्राहकांसाठी देखील ही योजना फायद्याची आहे.
काय आहेत एसबीआयच्या या योजनेच्या अटी आणि नियम?
एसबीआय स्पेशल एफडी योजना ही नवीन आणि विद्यमान एफडी गुंतवणूकदारांसाठी नूतनीकरणावर देखील उपलब्ध आहे. ही योजना केवळ मुदत ठेवींसाठी असून ती वार्षिक ठेवी तसेच कर बचत ठेवी, बहुपर्यायी ठेवी किंवा आवर्ती ठेवी म्हणजेच आरडी सारख्या ठेवींवर लागू होत नाही.
या योजनेतील कमीत कमी गुंतवणुकीची रक्कम फक्त एक हजार रुपये आहे आणि कमाल म्हणजे जास्तीत जास्त कितीही रकमेची गुंतवणूक तुम्ही करू शकतात. म्हणजेच कमाल गुंतवणुकीवर कुठल्याही प्रकारची मर्यादा नाही. तसेच या योजनेचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे जर गुंतवणूकदाराला या योजनेचा कालावधी संपण्यापूर्वी पैसे काढायचे असतील तर ते काढता येतात.
परंतु यामध्ये गुंतवणूकदाराला काही दंड भरावा लागतो. पाच लाखापर्यंतच्या ठेवींवर 0.50% दंड आकारला जाईल.तसेच पाच लाख ते तीन कोटी पर्यंतच्या ठेवींवर एक टक्के दंड लागू होईल. परंतु सात दिवसांमध्ये जर गुंतवणूक काढली तर कुठल्याही प्रकारचा दंड भरावा लागत नाही.