Mutual Funds SIP : गुंतवणुक करण्यासाठी मार्केटमध्ये एकापेक्षा एक पर्याय उपलब्ध आहेत. यातलाच एक लोकप्रिय प्रकार म्हणजे एफडी. सर्व सामान्य लोकं येथे गुंतवणूक करण्यावर भर देतात, येथील गुंतवणूक ही जोखमीची गुंतवणूक नसते. पण येथे गुंतवणुकीवर मिळणार परतावा मात्र मर्यादित असतो. अशातच काही गुंतवणूकदार असे आहेत जे जोखीम घेण्यास तयार असतात, म्हणूनच ते म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. येथील गुंतवणूक जोखमीची असली तरीदेखील येथे मिळणार परतावा सर्वाधिक असतो.
येथे हजर रुपयांपासून गुंतवणूक करून आपण भविष्यात लाखो रुपये कमवू शकतो. तुम्हीही सध्या गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल आणि भविष्यात चांगला निधी गोळा करू इच्छित असाल तर आजपासून तुम्ही ही गुंतवणूक सुरु करू शकता. येथे गुंतवणूक केल्यानंतर काही काळातच तुमच्याकडे चांगला निधी जमा होईल. योग्य रणनीती आणि लवकर गुंतवणूक सुरू केल्याने, तुम्ही अधिक चांगला निधी उभारण्यास सक्षम असाल.
तसे, बाजारात गुंतवणूक करण्याचे अनेक मार्ग आहेत. परंतु म्युच्युअल फंड (SIP) मध्ये योग्य धोरणासह गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते. हा गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय मानला जातो. कारण यामध्ये अनेक योजनांनी मागील काही काळापासून चांगला परतावा दिला आहे. आज म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे SIP द्वारे सोपे झाले आहे. कारण या क्षेत्रातील बहुतांश तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, येथे केलेल्या दीर्घकालीन गुंतवणुकीमुळे तुम्हाला मोठा परतावा मिळू शकतो. ज्यामध्ये तुम्हाला सरासरी 12 टक्के परतावा मिळू शकतो. तुम्ही जितके जास्त वेळ गुंतवणुकीत रहाल तितका तुम्हाला चक्रवाढीचा लाभ मिळेल.
येथे तुम्ही दरमहा फक्त पाच हजार रुपयांच्या SIP द्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक सुरू करू शकता. आजच्या काळात दरमहा पाच हजार रुपयांची बचत होऊ शकते. याद्वारे तुम्ही 25 लाख रुपयांचा निधी उभारू शकता. तुम्हाला फक्त 15 वर्षे सतत गुंतवणूक करत राहावे लागेल. जर तुम्ही दरमहा पाच हजार रुपये गुंतवले आणि ते 15 वर्षे सतत चालू ठेवले तर या वर्षांत तुम्ही 9 लाख रुपये गुंतवले असतील. आणि परतावा म्हणून तुम्हाला 12 टक्के रिटर्ननुसार 25 लाख रुपये मिळतील. ज्यामध्ये 16,22,880 रुपयांचे व्याज समाविष्ट आहे. म्हणजेच तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीच्या रकमेच्या दीडपट परतावा मिळेल. जे कुठल्याही योजनांमध्ये मिळणे कठीण आहे.