आर्थिक

Post Office : पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करा अन् दुप्पट परतावा मिळावा…

Post Office Saving Schemes : जर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला आज अशा एका स्कीमबद्दल सांगणार आहोत, जिथून तुम्ही बक्कळ पैसा कमवू शकता. या योजनेत ठराविक कालावधीसाठी पैसे जमा करून तुम्ही श्रीमंत होऊ शकता, कोणती आहे ही योजना पाहूया….

तस पाहायला गेलं तर पोस्ट ऑफिसमध्ये अनेक प्रकारच्या योजना चालवल्या जातात. यापैकी एक योजना किसान विकास पत्र (KVP) आहे. या योजनेत परताव्याची हमी आहे आणि कोणताही भारतीय नागरिक यामध्ये गुंतवणूक करू शकतो आणि योजनेद्वारे मोठा निधी जमा करू शकतो.

किसान विकास पत्रामध्ये गुंतवलेली रक्कम दुप्पट करण्याची हमी सरकार देते. म्हणजे, जर तुम्ही या योजनेत 5 लाख रुपये गुंतवले तर ते 10 लाख रुपये होतील आणि जर तुम्ही 10 लाख रुपये गुंतवले तर ते 20 लाख रुपये होईल.

तुम्ही किसान विकास पत्र योजनेत गुंतवणूक केल्यास ती रक्कम ११५ महिन्यांत (९ वर्षे, ७ महिने) दुप्पट होईल. तुम्ही या योजनेत 10 लाख रुपये जमा केल्यास ते 20 लाख रुपये होईल. सध्या ही योजना ७.५ टक्के दराने व्याज देत आहे.

येथे व्याजाची गणना वार्षिक आधारावर केली जाते. या योजनेअंतर्गत कोणतीही प्रौढ व्यक्ती एकल किंवा संयुक्त खाते उघडू शकते. याशिवाय 10 वर्षांपेक्षा जास्त वयाचे मूल त्याच्या/तिच्या नावावर किसान विकास पत्र घेऊ शकते.

एक पालक अल्पवयीन किंवा मानसिकदृष्ट्या अस्वस्थ व्यक्तीच्या वतीने खाते उघडू शकतो. खाते उघडताना आधार कार्ड, वय प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो, KVP अर्ज फॉर्म इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता असू शकते.

खाते उघडताना आधार कार्ड, वय प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो, KVP अर्ज फॉर्म इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता असू शकते. अनिवासी भारतीय या योजनेसाठी पात्र नाहीत.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts