आर्थिक

एलआयसीच्या ‘या’ प्लॅनमध्ये एकदाच पैसे गुंतवा आणि आयुष्यात पैशांच्या टेन्शन पासून मुक्त व्हा! वर्षाला मिळेल 1 लाख रुपये पेन्शन

LIC Pension Plan:- गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून अनेकविध पर्याय सध्या मार्केटमध्ये उपलब्ध असून गुंतवणूकदार त्यांच्या सोयीनुसार आणि आर्थिक दृष्टिकोनातून परवडतील अशा गुंतवणूक पर्यायाची निवड करत असतात. तसेच केलेली गुंतवणूक सुरक्षित राहण्याच्या दृष्टिकोनातून आणि केलेल्या गुंतवणुकीतून मिळणारा परतावा देखील चांगला मिळेल हे दोन मुद्दे देखील विचारात घेतले जातात.

या दोन्ही मुद्द्यांच्या आधारे जर आपण पाहिले तर बँकांच्या मुदत ठेव योजना आणि पोस्ट ऑफिसच्या योजना या खूप फायद्याच्या समजल्या जातात व गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर या योजनांना पसंती देतात. परंतु त्यासोबतच भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या देखील अनेक योजना म्हणजेच प्लान्स असून यामध्ये केलेली गुंतवणुक विमा संरक्षण मिळण्याच्या दृष्टिकोनातून फायद्याची आहे.

परंतु काही प्लान हे निवृत्तीनंतर पेन्शन मिळवण्याच्या दृष्टिकोनातून देखील महत्त्वाचे आहेत. आयुष्यात तुम्हाला वयाच्या 50/60 वर्षानंतर जर लागणाऱ्या खर्चासाठी ठराविक रक्कम हवी असेल व तसा तुमचा प्लान असेल तर तुम्ही एलआयसीच्या पेन्शन योजनेत गुंतवणुकीचा विचार करू शकतात व याकरिता एलआयसीची न्यू जीवन शांती प्लान ही योजना खूप फायद्याची आहे. त्यामध्ये तुम्हाला फक्त एकदाच पैसे गुंतवावे लागतात व आयुष्यभर तुम्हाला पेन्शन म्हणून ठराविक रक्कम मिळत राहते.

कुणाला घेता येतो एलआयसीच्या न्यू जीवन शांती प्लॅनचा लाभ?
तसे पाहायला गेले तर पेन्शनच्या संदर्भात भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीच्या अनेक पॉलिसी आहेत. परंतु यामध्ये न्यू जीवन शांती प्लान हा खूप महत्त्वाचा असून यामध्ये तुम्ही एकदाच पैसे गुंतवले तर काही काळानंतर आयुष्यभर तुम्हाला पेन्शनच्या स्वरूपात एक ठराविक रक्कम मिळत राहते.

एलआयसीचा हा प्लान नोकरी करणारी व्यक्ती असो किंवा व्यवसाय करणारी या दोघांना देखील घेता येतो. या पॉलिसीचा फायदा घेण्यासाठी किमान वय 30 आणि कमाल 79 वर्ष असणे गरजेचे आहे. या योजनेचे सगळ्यात महत्त्वाची वैशिष्ट्ये म्हणजे यामध्ये तुम्ही जितक्या लवकरात लवकर गुंतवणूक करायला लागाल तितकी तुम्हाला पेन्शनची रक्कम जास्तीत जास्त मिळते.

ही पॉलिसी सिंगल प्रीमियम म्हणजेच तुम्हाला यामध्ये एकदाच गुंतवणूक करावी लागते व या एकदाच केलेल्या गुंतवणुकीवर आयुष्यभर तुम्हाला पेन्शनचा लाभ मिळत राहतो. या प्लॅनमध्ये तुम्ही किमान दीड लाख रुपयांची गुंतवणूक करू शकतात व यापेक्षा जास्तीची रक्कम देखील गुंतवू शकतात.

सोप्या भाषेत सांगायचे म्हटले म्हणजे तुम्ही जितकी जास्तीत जास्त रक्कम गुंतवाल तितकी जास्तीत जास्त पेन्शन तुम्हाला मिळत राहते. या पॉलिसीमध्ये तुम्ही गुंतवणूक केल्यानंतर पाच वर्षांनी पेन्शनचा लाभ सुरू होतो. समजा तुम्ही तिसाव्या वर्षी जर एलआयसीच्या या प्लानमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला 35 व्या वर्षांपासून पेन्शन सुरू होते आणि 40 व्या वर्षापासून गुंतवणुकीला सुरुवात केली तर 45 व्या वर्षांपासून पेन्शन मिळण्यास सुरुवात होते व ही पेन्शन तुम्हाला संपूर्ण आयुष्यभर मिळत राहते.

यामध्ये समजा तुम्ही 45 वर्षे वयाच्या आहात व तुम्ही सिंगल प्रीमियम मध्ये अकरा लाख रुपये यामध्ये गुंतवले तर पाच वर्षानंतर म्हणजेच वयाचे पन्नास वर्षाचे झाल्यावर तुम्हाला पेन्शन स्वरूपात एका वर्षाला 99 हजार 440 रुपये पेन्शन म्हणून मिळत राहतात

किंवा तुम्ही 55 व्या वर्षी जर अकरा लाख रुपयांची गुंतवणूक केली तर साठ वर्षाचे जेव्हा तुम्ही व्हाल तेव्हा तुम्हाला पेन्शनचा लाभ मिळणे सुरू होते व वर्षाला एक लाख 2850 रुपये तुम्हाला पेन्शन म्हणून मिळत राहतात व तेही आयुष्यभर. यामध्ये पेन्शनचा लाभ तुम्ही वर्षालाच नाही तर सहा किंवा तीन किंवा दर महिन्याला देखील घेऊ शकतात.

एलआयसीच्या या प्लानमध्ये इतर काय फायदे मिळतात?
पेन्शन शिवाय या योजनेमध्ये इतर फायदे देखील म्हणतात. ज्या व्यक्तीने ही विमा पॉलिसी किंवा प्लॅन घेतला आहे व त्याचा जर मृत्यू झाला तर वारसाला म्हणजे नॉमिनीला संपूर्ण रक्कम ही व्याजासह परत केली जाते.

तसेच ही पॉलिसी तुम्ही केव्हाही सरेंडर करू शकतात व सरेंडर व्हॅल्यू इतर पॉलिसीपेक्षा जास्त असतो. तसेच यामध्ये केलेल्या गुंतवणुकीवर तुम्हाला कर्जाची सुविधा देखील मिळते व तुम्ही कर्ज देखील घेऊ शकतात. फक्त कर्ज घेण्यासाठी यामध्ये अट अशी आहे की तुमची पॉलिसी सुरू झाल्यानंतर तीन महिने पूर्ण होणे यासाठी गरजेचे असते.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts