Mutual Funds : आजच्या काळात, एसआयपी ही गुंतवणूकदारांची पहिली पसंती आहे. जवळ-जवळ प्रत्येक व्यक्ती येथे गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहे. पण येथील गुंतवणूक ही जोखमीची गुंतवणूक आहे. म्हणूनच येथे गुंतवणूक करताना विचारपूर्वक केली पाहिजे. जर तुम्ही प्रथमच SIP मध्ये गुंतवणूक करणार असाल तर आम्ही काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहोत जेणेकरून तुम्हाला कोणतेही नुकसान होणार नाही.
SIP मध्ये गुंतवणूक करताना या गोष्टी लक्षात ठेवा !
-जेव्हाही तुम्ही एसआयपीमध्ये गुंतवणूक सुरू करण्याचा विचार करता तेव्हा तुम्ही एसआयपीमध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी योग्य संशोधन केले पाहिजे किंवा तुम्ही सल्लागाराचा सल्ला देखील घेतला पाहिजे. संशोधनाशिवाय कोणत्याही फंडात पैसे गुंतवू नयेत. यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते.
-आजच्या काळात म्युच्युअल फंडातील गुंतवणूक खूप वाढली आहे, त्यामुळे हुशारीने गुंतवणूक करा. तुम्ही कोणताही एसआयपीचा निर्णय फक्त त्याचे रिटर्न्स पाहून घेऊ नये. कारण कधी-कधी चांगला परतावा देणारे एसआयपीचे रिटर्नही नकारात्मक होतात.
-तज्ञांच्या मते, अनेक वेळा असे दिसून येते की गुंतवणूकदार वेळोवेळी एसआयपी बंद करत राहतात. कधी थांबवतात तर कधी सुरू करतात, असे केल्याने गुंतवणूकदारांना पूर्ण लाभ मिळत नाही. त्याचबरोबर अनेक वेळा नुकसानही सहन करावे लागते.
-एसआयपीमध्ये गुंतवणुकीचा मार्ग असा आहे की तुम्ही वेगवेगळ्या फंड आणि सेक्टरमध्ये पैसे गुंतवावेत, जेणेकरून एखादा फंड किंवा सेक्टर नकारात्मक झाल्यास तुमच्या पोर्टफोलिओवर जास्त परिणाम होणार नाही.
-एसआयपीमध्ये गुंतवणूक करताना गुंतवणूकदारांनी हे लक्षात ठेवावे की एसआयपीमध्ये गुंतवलेली रक्कम जास्त किंवा कमी नसावी. ते तुमच्या आर्थिक उद्दिष्टांनुसार आणि जोखीम सहनशीलतेनुसार असावे. जर तुम्ही खूप कमी पैसे गुंतवलेत तर तुम्हाला तेवढा चांगला परतावा मिळणार नाही.
जर तुम्हाला पहिल्यांदा एसआयपीमध्ये गुंतवणूक सुरू करायची असेल, तर त्यासाठी तुम्हाला प्रथम ब्रोकरेज ॲप निवडावा लागेल. तुम्ही Grow, Zerodha सारख्या कोणत्याही ॲपद्वारे गुंतवणूक सुरू करू शकता. यानंतर तुम्हाला केवायसीची औपचारिकता पूर्ण करावी लागेल. यानंतर, तुमच्या ॲपमध्ये व्हेरिफिकेशन आणि व्हिडिओ कॉल केवायसी होईल. नवीन खाते नोंदणी करण्यासाठी तुम्हाला एक अर्ज भरावा लागेल. यानंतरच तुम्ही एसआयपीमध्ये पैसे गुंतवणे सुरू करू शकता.