आर्थिक

Investing Tips : जोखीम न घेता पैसा दुप्पट…गुंतवणूक करताना फॉलो करा ‘या’ टिप्स….

Investing Tips : देशात आणि जगात महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अनेक देशांमध्ये युद्धही सुरू आहे. तसेच गेल्या काही वर्षांत कोरोनामुळे लोकांची कमाई, बचत आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत सध्या उत्पन्न वाढवणे खूप गरजेचे आहे आणि त्यासाठी चांगला पर्याय म्हणजे गुंतवणूक. पण गुंतवणूक करताना खूप विचारपूर्वक केली पाहिजे. बऱ्याच चांगल्या परतवव्यासाठी लोकं जोखीम घेण्यास देखील तयार असतात.

अशातच तुम्हाला हे जाणून आनंद होईल की कमी जोखीम घेऊनही तुम्ही तुमचे पैसे जलद वाढवू शकता. होय आज आम्ही तुम्हाला कमी वेळात पैशाने डबल करण्याचा फंडा सांगणार आहोत.

तुम्ही म्युच्युअल फंडांद्वारे तुमची कमाई सहज वाढवू शकता. आणि धोकाही कमी आहे. आजच्या काळात, तज्ञांचा असाही विश्वास आहे की एखादी व्यक्ती कमी जोखीम पत्करून लार्ज कॅप फंडांमध्ये गुंतवणूक करू शकते. इतर फंडांच्या तुलनेत या फंडांमध्ये जोखीम कमी असते. येथे तुम्ही दरमहा फक्त ५०० रुपये इतकी कमी गुंतवणूक करू शकता.

कमी वेळेत चांगले रिटर्न्स

आजच्या काळात, लहान-मोठे सर्व प्रकारचे गुंतवणूकदार त्यांच्या कमाईचा काही भाग म्युच्युअल फंडात गुंतवणे पसंत करतात. म्युच्युअल फंडात गुंतवलेले तुमचे पैसे खरे तर अप्रत्यक्षपणे शेअर बाजारात गुंतवले जातात. परंतु, यामध्ये तुमची जोखीम कमी होते कारण तुम्ही ज्या कंपनीद्वारे म्युच्युअल फंडात पैसे गुंतवत आहात. तिथे बसलेले तज्ज्ञ तुमचे पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवतात. तसेच, लार्ज कॅप कंपन्या स्थिर राहतात, त्यामुळे त्यांच्यातील जोखीम कमी आहे.

म्युच्युअल फंडात गुंतवलेले पैसे एफडी किंवा आरडीपेक्षा जास्त नफा देतात. आत्तापर्यंतच्या आकडेवारीवर नजर टाकली तर म्युच्युअल फंडातून मिळणारा सरासरी परतावा १५ टक्के आहे. हा आकडा वाढू शकतो किंवा कमी होऊ शकतो. परंतु, यामध्ये तुमचा धोका कमी असेल.

चांगले म्युच्युअल फंड

काही म्युच्युअल फंडांनी वेगवेगळ्या गुंतवणूक अ‍ॅप्सद्वारे चांगला परतावा दर्शविला आहे. हे फंड, HDFC लार्ज आणि मिड-कॅप फंड, मोतीलाल ओसवाल लार्ज आणि मिड-कॅप फंड, ICICI प्रुडेन्शियल लार्ज आणि मिड-कॅप फंड, क्वांट लार्ज आणि मिड-कॅप फंड आणि बंधन कोअर इक्विटी फंड आहेत.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts