आर्थिक

Investment Option : मिळवायचा असेल जबरदस्त परतावा तर आजच करा ‘या’ योजनांमध्ये गुंतवणूक, वाचा सविस्तर

Investment Option : अनेकजण आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या भविष्यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करत असतात. सध्या बाजारात अशा अनेक योजना आहेत ज्यात कोणत्याही जोखिमेशिवाय उत्तम परतावा मिळतो.

आता तुम्हीही यात गुंतवणूक करून चांगली कमाई करू शकता. विशेष म्हणजे अनेकजण या योजनांमध्ये गुंतवणूक करत आहेत. यातील काही योजनांमध्ये फक्त शानदार परतावा मिळत नाही तर कर सवलतही मिळत आहे. कोणत्या आहेत या योजना? जाणून घ्या.

पोस्ट ऑफिस योजना

आता तुम्ही पोस्ट योजनेमध्येदेखील गुंतवणूक करू शकता. पोस्ट ऑफिसची टाईम डिपॉझिट योजना खूप लोकप्रिय आहे. या योजनेमध्ये तुम्हाला 3 ते 5 वर्षांसाठी गुंतवणूक करता येते. हे लक्षात घ्या की पोस्ट ऑफिस प्रत्येक तिमाहीत व्याजदर बदलत असतात. शिवाय यामध्ये ग्राहकाला कर सवलतही मिळते.

बँक एफडी

देशातील सर्व बँका ग्राहकांना एफडी सुविधा देत असतात. आता तुम्ही FD मध्ये ठराविक कालावधीसाठी यात गुंतवणूक करू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बँक तुम्हाला बचत खात्यापेक्षा एफडीवर सर्वात जास्त व्याज देते. तुम्हाला किती वर्षांसाठी गुंतवणूक करायची आहे आणि बँक तुम्हाला किती परतावा देत आहे? हे गुंतवणूक करण्यापूर्वी एकदा जाणून घ्या.

कंपनी एफडी

आता अनेक कंपन्या त्यांच्या व्यवसायासाठी पैसे जमा करत असतात. यात कंपनी एफडीची सुविधाही देते. आता तुम्हीदेखील त्यात गुंतवणूक करू शकता. परंतु गुंतवणूक करण्यापूर्वी ती कंपनी बनावट नाही ना? याची काळजी घ्यावी. आज बाजारात अनेक प्रकारच्या कंपन्या आहेत ज्या FD सुविधा देत आहेत. आयसीआयसीआय होम फायनान्स एफडी आणि मणिपाल हाऊसिंग फायनान्स सिंडिकेट या कंपनी एफडी देतात.

डेट म्युच्युअल फंड

आता तुम्हाला डेट म्युच्युअल फंडातदेखील गुंतवणूक करता येईल. यात तुम्ही 1 वर्षासाठी गुंतवणूक करू शकता. तसेच तुम्हाला यात एकूण 6 ते 7 टक्क्यांचा परतावा मिळेल.

आवर्ती ठेव

आता तुम्हाला आवर्ती ठेवमध्येही गुंतवणूक करता येईल. विशेष म्हणजे यात तुम्हाला 6 महिने, 9 महिने आणि 1 वर्ष यापैकी कोणताही एक पर्याय निवडता येईल. हे लक्षात घ्या ही एक प्रकारची FD योजना असून त्याचा व्याजदर वेगळा आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts