Investment Plan : प्रत्येक पालकाला त्यांच्या मुलांच्या भविष्याची चिंता अगदी मुलाच्या जन्मापासूनच सतावते. मुलांच्या उच्च शिक्षणासाठी खूप पैसा खर्च होतो. अशास्थितीत आतापासून त्यांच्यासाठी पैसे वाचवून ठेवणे महत्वाचे ठरते. जर पालकांनी मुलांच्या जन्मापासूनच त्यांच्यासाठी बचत करायला सुरुवात केली तर भविष्यात ते सहज मोठा निधी गोळा करू शकतात, आणि मुलांच्या उज्वल भविष्यासाठी वापरू शकतात.
आज आम्ही तुमच्यासाठी दोन उत्तम गुंतवणुकीचे पर्याय आणले आहेत, जिथे तुम्ही दरमहा 5,000 रुपयांची गुंतवणूक करून चांगला निधी कमावू शकता, या गुंतवणुकीवर तुम्हाला चक्रवाढ व्याज देखील मिळेल आणि काही वर्षातच तुमच्या खात्यात लाखो रुपये जमा होतात.
PPF ही एक अशी योजना आहे ज्यामध्ये देशातील कोणताही नागरिक सहजपणे पैसे गुंतवू शकतो. पीपीएफमध्ये दरवर्षी किमान 500 रुपये आणि कमाल 1.5 रुपये गुंतवले जाऊ शकतात. ही योजना तुम्हाला अशी हमी देखील देते की तुम्ही कितीही रक्कम गुंतवत आहात, त्यावर तुम्हाला हमी परतावा मिळेल. सध्या पीपीएफवर ७.१ टक्के दराने व्याज मिळत आहे.
अशा परिस्थितीत जर तुम्ही ५ हजार रुपये गुंतवले तर वर्षभरात ६० हजार रुपये गुंतवाल. पीपीएफ ही १५ वर्षांची गुंतवणूक योजना आहे. म्हणजे 15 वर्षांनी परिपक्वता प्राप्त होते.
तुम्ही या योजनेत दरमहा ५००० रुपये जमा केले तर त्यावर तुम्हाला 7.1 टक्के दराने, 7,27,284 रुपये फक्त व्याज म्हणून मिळतील. ५००० च्या गुंतवणुकीवर तुम्ही १५ वर्षात 9 लाख रुपये जमा कराल, यावर व्याजासह एकूण 16 लाख 27 हजार 284 रुपये मिळतील. ही रक्कम तुम्ही तुमच्या मुलाच्या भविष्यासाठी वापरू शकता.
दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी एसआयपी उत्तम पर्याय !
जर तुम्ही जोखीम घेण्यास सक्षम असाल तर तुम्ही SIP द्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकता. हे बाजाराशी जोडलेले असल्याने, परताव्याची हमी दिली जात नाही, परंतु तज्ञांच्या मते एसआयपी दीर्घ कालावधीत सरासरी 12 टक्के परतावा देऊ शकते.
जरी तुम्ही SIP पर्याय निवडला तर तुम्ही येथीही दरमहा 5 हजार रुपये गुंतवू शकता, येथे 12 टक्के दराने चक्रवाढ केली जाते. 5 हजाराने येथे तुमची गुंतवणूक 15 वर्षांत 9 लाख रुपये होईल, 15 वर्षांनंतर, व्याजासह तुम्हाला येथे 25,22,880 रुपये मिळतील.