आर्थिक

Investment Plan: 1 वर्ष कालावधी करिता गुंतवणुकीसाठी उत्तम आहेत ‘हे’ गुंतवणूक पर्याय! वर्षभरात कमवू शकतात लाखो रुपये?

Investment Plan:- गुंतवणूक जेव्हा केली जाते तेव्हा ती दोन प्रकारे केली जाते. कालावधीनुसार पाहिले तर एक दीर्घकालीन तर एक अल्पकालीन असे दोन प्रकार आपल्याला गुंतवणुकीचे सांगता येतील. लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म असे आपण त्याला म्हणतो. गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय सध्या उपलब्ध आहेत

व आर्थिक तज्ञांच्या मते जर तुमचा गुंतवणूक पोर्टफोलिओ असेल तर यामध्ये दीर्घकालीन आणि अल्पकालीन अशा दोन्ही प्रकारच्या गुंतवणुकीचा समावेश असणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे आपल्याला प्रश्न पडतो की नेमके मग अल्पकालीन कालावधीसाठी जर गुंतवणूक करायचे असेल तर कोणते गुंतवणूक पर्याय फायद्याचे ठरतात?

 शॉर्ट टर्म गुंतवणुकीचे फायदे

दीर्घकालीन गुंतवणुकीच्या तुलनेत जर आपण शॉर्ट टर्म गुंतवणुकीचे फायदे बघितले तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे व शॉर्ट टर्म गुंतवणूक पर्याय मध्ये पैसे गुंतवले असतील तर अडचणीच्या कालावधीमध्ये तुम्ही त्यातील पैशांचा वापर केव्हाही करू शकतात. त्यामुळे तुमचा दीर्घकालीन जर काही प्लान सुरू असेल तर तो बंद करण्याची गरज तुम्हाला भासत नाही.

 एक वर्षभराच्या गुंतवणुकीसाठीचे बेस्ट ऑप्शन

1- मुदत ठेव म्हणजेच फिक्स डिपॉझिट तुम्हाला जर एकरकमी रक्कम जमा करायची असेल तर फिक्स डिपॉझिट म्हणजेच मुदत ठेव हा पर्याय उत्तम आहे. हा सर्वात जास्त पसंतीचा पर्याय म्हणून फिक्स डिपॉझिट कडे पाहिले जाते. सामान्यपणे तुम्ही कोणत्याही बँकेत सात दिवसापासून ते अगदी दहा वर्षापर्यंत मुदत ठेव सेवेचा फायदा घेऊ शकतात.

मुदत ठेवींवर देण्यात येणारा व्याजदर हा ठेवीच्या कालावधीनुसार बदलत असतो. बँकेसोबतच तुम्ही पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेव योजनांमध्ये देखील गुंतवणूक करू शकतात व पोस्ट ऑफिस मध्ये एक वर्ष ते पाच वर्षापर्यंत मुदत ठेव पर्याय मिळतो.

अशा प्रसंगी तुम्ही बँक आणि पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेव योजनांवर मिळणारा व्याजदरांची तुलना करून एक वर्षासाठी एफडीचा विचार करू शकता.

2- डेट मॅच्युअल फंड हा पर्याय देखील एक उत्तम असून एक वर्षासाठी गुंतवणूक करायची असेल तर हा उत्तम पर्याय आहे. डेट मॅच्युअल फंडमध्ये तुम्ही एक वर्षांकरिता पैशांची गुंतवणूक करू शकतात. डेट म्युच्युअल फंडा मधील गुंतवणूक सुरक्षित ठिकाणी गुंतवली जाते व मॅच्युरिटी डेट देखील याची ठरलेली असते. डेट म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यावर तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो.

3- रिकरिंग डिपॉझिट स्कीम अर्थात आरडी प्रत्येक महिन्याला थोडे थोडे पैशांची गुंतवणूक करायची असेल तर आरडी अर्थात रिकरिंग डिपॉझिट उत्तम पर्याय आहे. यामध्ये तुम्ही ठराविक रक्कम प्रत्येक महिन्याला जमा करू शकतात मॅच्युरिटी नंतर व्याजासह तुम्हाला पूर्ण रक्कम मिळते.

आता तुम्ही एक वर्षापासून वेगवेगळ्या कालावधीचा पर्याय निवडू शकतात. देशातील सर्व बँक आणि पोस्ट ऑफिसमध्ये डिपॉझिटचा पर्याय मिळतो व पोस्ट ऑफिसमध्ये याचा कालावधी पाच वर्षाचा आहे.

4- सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लांट अर्थात एसआयपी एसआयपी हा देखील शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट साठी एक चांगला पर्याय आहे. यामध्ये आपण आपल्या बजेटनुसार प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम जमा करू शकतो आणि हवं तेव्हा ती बंद देखील करून तुम्ही तुमचे पैसे वापरू शकता.

गुंतवणुकीच्या सर्व पर्यायांपेक्षा यामध्ये तुम्हाला चांगला परतावा मिळण्याची शक्यता अधिक असते. या पर्यायांमध्ये तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला सरासरी 12 टक्क्यांनी परतावा मिळू शकतो.

5- कार्पोरेट एफडी अनेक कंपन्या व्यवसाय वाढीसाठी बाजारातून पैसे गोळा करत असतात व त्यासाठी या कंपन्या एफडी जारी करतात.बँक एफडी ज्याप्रमाणे काम करतात अगदी त्याचप्रमाणे कार्पोरेट एफडी देखील काम करते. यासाठी कंपन्या फॉर्म जारी करतात व तो ऑनलाईन भरावा लागतो.

बँकांच्या एफडी वर मिळणाऱ्या व्याजदरापेक्षा कॉर्पोरेट एफडीचा व्याजदर जास्त असतो.परंतु यामध्ये जोखीम जास्त असते. कार्पोरेट एफडीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर मोठे आणि उच्च दर्जाच्या कंपन्यांच्या एफडीमध्ये करणे गरजेचे असते.

कारण यामध्ये जोखीम कमी असते. कार्पोरेट एफडीचा मॅच्युरिटी कालावधी पाहिला तर तो एक ते पाच वर्षांचा असतो. यामध्ये उच्च दर्जाच्या रेटिंग असलेल्या कंपन्या एफडीवर 9.25 टक्के ते 10.75 टक्के पर्यंत व्याज देतात.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts