आर्थिक

Investment Planning: ‘या’ योजनांमध्ये करा गुंतवणूक आणि 15 वर्षात मुलांच्या शिक्षणासाठी जमा करा मोठी रक्कम! वाचा संपूर्ण माहिती

Investment Planning:- आपण आज नोकरी किंवा व्यवसाय करून कष्टाने जो काही पैसा कमावतो त्या पैशाची बचत आणि गुंतवणूक या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. भविष्यकालीन आर्थिक गरजांच्या दृष्टिकोनातून बचत आणि गुंतवणुकीचे नियोजन हे खूप महत्त्वाचे असते.

आज जर आपण गुंतवणुकीकडे लक्ष दिले नाही तर येणाऱ्या भविष्यकाळात मुलांचे शिक्षण तसेच लग्न, आरोग्य विषयक काही आपत्कालीन परिस्थिती इत्यादी गोष्टींमध्ये पैशांची समस्या निर्माण होऊ शकते व मोठ्या अडचणींना तोंड द्यायला लागू शकते. त्यामुळे चांगल्या गुंतवणूक पर्याय शोधून त्यामध्ये तुम्ही जे काही कमावता त्यामधून काही रक्कम गुंतवणूक करणे खूप गरजेचे असते.

यामध्ये जर आपण शिक्षणाचा विचार केला तर मुलांच्या उच्च शिक्षणाला खूप मोठा खर्च येतो व त्या दृष्टिकोनातून आत्तापासूनच गुंतवणुकीचे नियोजन करणे खूप गरजेचे असते. त्यामुळे मुलांच्या उच्च शिक्षणासाठी जर तुम्हाला चांगला फंड तयार करायचा असेल तर तुम्ही मुलांच्या जन्मापासून गुंतवणूक करायला सुरुवात करणे गरजेचे आहे. या अनुषंगानेच आपण या लेखांमध्ये उत्तम असे गुंतवणुकीचे पर्याय बघणार आहोत.

मुलांच्या उच्चशिक्षणासाठी पैसा हवा तर हे गुंतवणूक पर्याय ठरतील फायद्याचे :–  1- एसआयपी- तुमचे जर पैशांच्या बाबतीत थोडीफार जोखीम स्वीकारण्याची किंवा पत्करण्याची तयारी असेल तर तुम्ही एसआयपीच्या मार्गाने म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करू शकतात. यामध्ये म्युच्युअल फंड पाहिले तर हे मार्केट लिंक्ड असल्यामुळे परताव्याची हमी नसते. परंतु गुंतवणूक तज्ञांच्या मतानुसार जर पाहिले तर एसआयपी मध्ये जर तुम्ही दीर्घ कालावधी करिता गुंतवणूक करत गेलात तर बारा टक्के सरासरी यामध्ये तुम्हाला परतावा मिळू शकतो.

तुम्ही एसआयपी पर्याय निवडला तरी देखील तुम्हाला प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपये गुंतवावे लागतील. यावर जर तुम्ही सरासरी 12 टक्क्यांचा परतावा पकडला तरी देखील पंधरा वर्षांमध्ये तुम्ही नऊ लाख रुपयांची गुंतवणूक कराल आणि त्यावर तुम्हाला 16 लाख 22 हजार 880 रुपयांचे व्याज मिळेल. पंधरा वर्षानंतर तुमची गुंतवणुकीची रक्कम आणि त्यावर मिळणारे व्याज हे एकूण 25 लाख 22 हजार 880 रुपये होईल. ही रक्कम तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी खूप फायद्याची ठरू शकते.

2- सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीपीएफ योजना- सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीपीएफ योजना ही एक महत्त्वाची गुंतवणूक योजना असून यामध्ये तुम्ही प्रत्येक वर्षाला कमीत कमी पाचशे रुपये ते जास्तीत जास्त दीड लाख रुपये गुंतवू शकतात. या योजनेच्या सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या योजनेमध्ये तुम्ही केलेल्या गुंतवणुकीला सरकारची हमी मिळते.

म्हणजेच तुम्ही यामध्ये कितीही रक्कम गुंतवली तरी तुम्हाला हमी परतावा या माध्यमातून मिळतो. सध्या या योजनेमध्ये 7.1% दराने व्याज दिले जात असून यामध्ये जर तुम्ही प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपये गुंतवले तर एका वर्षामध्ये तुमचे 60 हजार रुपये यामध्ये जमा होतात. ही योजना पंधरा वर्षांची असून या पंधरा वर्षात तुमचे नऊ लाख रुपयांची गुंतवणूक यामध्ये होते व मिळणारे 7.1% दराने व्याज तुम्हाला सात लाख 27 हजार 24 मिळते.

या योजनेच्या परिपक्वते नंतर तुम्हाला नऊ लाख रुपये गुंतवलेली रक्कम आणि मिळणारे व्याज असे मिळून 16 लाख 27 हजार 244 रुपये मिळतात. ही रक्कम तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. अशा पद्धतीने या दोन्ही योजना मुलांच्या शैक्षणिक भविष्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts