आर्थिक

Investment Plans : 18 व्या वर्षापासून दररोज वाचवा 7 रुपये, वृद्धापकाळात मिळवा 5000 रुपये पेन्शन !

Investment Plans : कोरोना काळानंतर प्रत्येकाला गुंतणुकीचे महत्व समजले आहे. आज प्रत्येकजण गुंतवणुकीबाबत जागरूक झाला आहे. गुंतवणुकीच्या बाबतीत असे म्हंटले जाते जेवढ्या लवकर गुंतवणूक कराल तितके चांगले तुम्ही तुमचे भविष्य सुरक्षित करू शकाल. सामान्यत: लोक गुंतवणुकीद्वारे निधी जोडतात, परंतु तरीही नियमित उत्पन्नाची चिंता असते कारण जेव्हा वृद्धापकाळात शरीर साथ देत नाही तेव्हा छोट्या छोट्या कामांसाठीही इतरांवर अवलंबून राहणे वाढते. अशा परिस्थितीत जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या मजबूत असाल तर तुम्ही तुमचे म्हातारपणाचे आयुष्य खूप चांगले जगू शकाल.

जर तुम्हाला आततापसूनच तुमच्या वृद्धापकाळासाठी नियमित उत्पन्नाची व्यवस्था करायची असेल, तर तुम्ही सरकारच्या अटल पेन्शन योजनेत (APY) गुंतवणूक करू शकता. भारत सरकारच्या या योजनेद्वारे तुम्ही दरमहा मासिक 5,000 रुपयांपर्यंतचे पेन्शन मिळवू शकता शकते. मात्र, तुम्हाला किती पेन्शन मिळेल हे तुमच्या गुंतवणुकीवर अवलंबून आहे. कोणताही भारतीय नागरिक जो करदाता नाही आणि ज्यांचे वय 18 ते 40 वर्षे दरम्यान आहे, तो व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकतो.

जर तुम्ही वयाच्या 18 व्या वर्षापासून अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करायला सुरुवात केली तर तुम्हाला दर महिन्याला फक्त थोडीशी रक्कम गुंतवावी लागेल आणि वयाच्या 60 व्या वर्षी तुम्ही 5,000 रुपये मासिक पेन्शनची व्यवस्था करू शकता. जर तुम्ही वयाच्या 18 व्या वर्षापासून या योजनेत गुंतवणूक करण्यास सुरुवात केली तर तुम्हाला या योजनेत दर महिन्याला 210 रुपये जमा करावे लागतील, म्हणजेच तुम्हाला दररोज फक्त 7 रुपये वाचवावे लागतील. पण जर तुम्ही 18 वर्षापेक्षा जास्त असाल तर तुमची रक्कम वाढते.

खाते कसे उघडायचे?

तुम्हालाही अटल पेन्शन योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल, तर सर्वप्रथम बँकेत बचत खाते उघडा. जर तुमचे आधीच बँकेत बचत खाते असेल, तर तुम्हाला तेथून योजनेचा अर्ज प्राप्त करावा लागेल. फॉर्ममध्ये नाव, वय, मोबाईल नंबर, बँक खाते क्रमांक इत्यादी सर्व माहिती अचूक भरा. मागितलेली सर्व आवश्यक कागदपत्रे जोडा. यानंतर फॉर्म बँकेत जमा करा. यानंतर तुमच्या सर्व कागदपत्रांची पडताळणी केली जाईल आणि अटल पेन्शन योजनेअंतर्गत तुमचे खाते उघडले जाईल.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts