Investment Plans : नोकरी व्यतिरिक्त जर तुम्हाला पैसे कमवायचे असतील तर तुम्ही गुंतवणूक करू शकता. गुंतवणूक करून तुम्ही एक मोठी रक्कम जमा करू शकता. बाजारात अशा अनेक योजना आहेत ज्या तुम्हाला श्रीमंत बनवण्यासाठी पुरेशा आहेत. आज आम्ही तुमच्यासाठी अशाच काही योजना घेऊन आलो आहोत.
भारतातील मोठ्या संस्थांमध्ये गणल्या जाणार्या पोस्ट ऑफिस आणि एसबीआयमध्ये एफडी करून तुम्ही उत्तम कमाई करू शकता, पण या दोन्हीमध्ये तुम्हाला कुठे जास्त परतावा मिळेल, याविषयी आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.
पोस्ट ऑफिस आणि SBI योजनांमध्ये गुंतवणूक करून तुम्ही बंपर परतावा कमावू शकता. तुम्हाला तीन वर्षांच्या एफडी योजनांवर चांगला परतावा मिळू शकतो.काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने पोस्ट ऑफिस टर्म डिपॉझिट स्कीमच्या व्याजदरात 10 बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे. आता तुम्ही यात तीन वर्षांसाठी गुंतवणूक केल्यास, तुम्हाला 7 टक्क्यांऐवजी 7.10 टक्के व्याजाचा लाभ मिळेल.
यासोबतच 1 जानेवारी 2024 ते 31 मार्च 2024 पर्यंत पोस्ट ऑफिसचे नवीन दर लागू करण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने 27 डिसेंबर 2023 रोजी त्यांच्या 2 कोटी रुपयांपेक्षा कमी FD योजनांवरील व्याजदरात वाढ जाहीर केली आहे. SBI ने वेगवेगळ्या कालावधीच्या FD वरील दरात 25 बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आता 3 ते 5 वर्षांच्या कालावधीसाठी FD वर वाढीव व्याज देईल. हे व्याज 25 बेसिस पॉइंट्सने वाढवून 6.75 टक्के केले आहे. हे दर सर्वसामान्य नागरिकांना देण्यात येत आहेत.
अशातच जर तुम्ही एफडीवर चांगला परतावा मिळवू इच्छित असाल तर पोस्ट ऑफिस टर्म डिपॉझिट स्कीमवर तुम्हाला जास्त व्याजदराचा लाभ मिळेल.