Investment Scheme:- कष्टाने कमावलेल्या पैशांची गुंतवणूक करणे ही भविष्यकालीन आर्थिक स्थिरतेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची बाब असल्यामुळे गुंतवणुकीला खूप मोठे महत्त्व आहे. गुंतवणूक करताना केलेली गुंतवणूक सुरक्षित रहावी व त्यातून मिळणारा आर्थिक परतावा योग्य मिळावा या दृष्टिकोनातून गुंतवणूक पर्यायांमधून कुठल्याही एका पर्यायाची निवड केली जाते.
जर आपण गुंतवणूक पर्याय पाहिले तर यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय उपलब्ध असून परताव्याच्या दृष्टिकोनातून यामध्ये पर्यायांची निवड केली जाते. बरेच व्यक्ती बँकेमध्ये मुदत ठेव योजनांमध्ये गुंतवणूक करतात. तर काहीजण शेअर मार्केट, एलआयसी सारखे अनेक योजनांचा आधार घेत असतात.
परंतु यामध्ये जर आपण म्युच्युअल फंड एसआयपी म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनचा विचार केला तर हा गुंतवणुकीसाठी एक चांगला पर्याय मानला जातो. वास्तविक आता म्युच्युअल फंडामध्ये एसआयपी द्वारे गुंतवणूक केली जाते. एसआयपी ही गुंतवणूक स्टॉकमध्ये थेट पैसे गुंतवण्यापेक्षा कमी जोखमीची गुंतवणूक मानली जाते
व यामध्ये किती परतावा मिळेल याची कुठलेही प्रकारची शाश्वती नसली तरी देखील सरासरी पकडली तर बारा टक्क्यांचा परतावा या माध्यमातून मिळतो. 12 टक्क्यांचा जरी परतावा मिळाला तरी इतर कुठल्याही प्रकारच्या गुंतवणूक योजनेपेक्षा हा परतावा जास्त आहे. तसेच चक्रवाढीमुळे एसआयपी चे पैसे खूप वेगाने वाढतात.
त्यामुळे या कालावधीत चांगला परतावा मिळण्याची अपेक्षा असेल तर एसआयपीत केलेली गुंतवणूक हा एक खूप फायद्याचा सौदा सिद्ध होऊ शकतो. यामध्ये तुम्ही पाचशे रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकतात व तुमच्या आर्थिक बजेटनुसार तुम्ही यात वाढ किंवा घट देखील करू शकतात.
आर्थिक तज्ञांच्या मते यामध्ये दीर्घकाळपर्यंत गुंतवणूक केली व उत्पन्न वाढले तसेच जर थोडी थोडी गुंतवणूक वाढवत राहिले तर तुम्हाला चांगला नफा मिळतो. या माध्यमातून तुम्ही प्रत्येक महिन्याला एक हजार रुपयांची गुंतवणूक केली तरी तुम्ही 35 लाख रुपये पेक्षा जास्त निधी मिळवू शकतात.
पस्तीस लाख रुपये पेक्षा जास्त रक्कम कशी जमा होईल?
समजा तुम्ही एसआयपी केली व प्रत्येक महिन्याला 1000 रुपयांची गुंतवणूक सुरू केली. तर यानुसार तुम्ही वर्षाला 12000 रुपयांची गुंतवणूक करू शकतात. हे गुंतवणूक तुम्ही तीस वर्षे सतत चालू ठेवली तर तुम्ही तीस वर्षात तीन लाख 60 हजार रुपये तुमची गुंतवणूक जमा होते
व यावर सरासरी 12 टक्के व्याज आकारले जाते व तीन लाख साठ हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर तुम्हाला केवळ व्याज म्हणून 31 लाख 69 हजार 914 मिळतील. अशाप्रकारे 30 वर्षानंतर एसआयपी मॅच्युरिटी वर तुम्हाला एकूण 35 लाख 69 हजार 914 मिळतील. जे तुम्ही गुंतवणूक केलेल्या रकमेच्या दहा पटीने जास्त असतील.
ही आकडेवारी सरासरी 12% व्याजदराच्या आधारावर करण्यात आली आहे. परंतु जर यामध्ये तुम्हाला यापेक्षा जास्त व्याज मिळाले तर मिळणारा परतावा रक्कम जास्त वाढू शकते.
या तीस वर्षांमध्ये जर तुम्ही गुंतवणुकीच्या रकमेत पाच टक्क्यांनी दरवर्षी वाढ केली तर तुम्ही तीस वर्षात एकूण सात लाख 97 हजार 266 रुपये गुंतवाल आणि तीस वर्षानंतर सरासरी 12% वार्षिक दराने तुम्ही 52 लाख 73 हजार 406 रुपये या माध्यमातून मिळवू शकतात.
अशा पद्धतीने तुम्ही 1000 रुपयाची मासिक गुंतवणूक केली तरी चांगला फंड निर्माण करू शकतात.