Investment Scheme:- तुम्ही किती पैसा कमावता याला जितके महत्त्व आहे तितकेच तुम्ही जो काही पैसा कमावता त्याची बचत कशी करतात व त्या बचतीची गुंतवणूक कोणत्या ठिकाणी करतात? या गोष्टींना खूप मोठे महत्त्व आहे. तुम्ही कमावलेल्या पैशांची गुंतवणूक जर चांगल्या योजनांमध्ये केली तर तुम्हाला नक्कीच अशा योजनांमधून गुंतवणुकीवर परतावा चांगला मिळतो व काही वर्षांनी गुंतवणुकीत सातत्य ठेवून मोठा फंड या माध्यमातून उभा करू शकतात.
तसे पाहायला गेले तर अनेक गुंतवणूक योजनांचे पर्याय आपल्याला दिसून येतात. परंतु या पर्यायांची निवड करताना तुम्हाला केलेल्या गुंतवणुकीवर किती परतावा मिळणार आहे आणि तुमची गुंतवणूक सुरक्षित राहणार आहे की नाही? हे पाहणे देखील तितकेच गरजेचे असते.
जर तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीच्या माध्यमातून जर करोडपती व्हायच्या असेल तर चांगल्या योजनेमध्ये तुम्ही गुंतवणुकीत सातत्य ठेवून काही वर्षांनी करोडपती होऊ शकतात. अशा अनेक योजना आहेत
परंतु यामध्ये जर आपण सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी अर्थात पीपीएफ योजनेचा विचार केला तर ही योजना तुम्हाला तुम्ही केलेल्या गुंतवणुकीच्या बाबतीत सुरक्षितता तर देईलच परंतु तुम्हाला करोडपती होण्यासाठी देखील मदत करेल. याच योजनेची महत्त्वपूर्ण माहिती आपण या लेखात घेऊ.
पीपीएफच्या माध्यमातून पंचवीस वर्षात तुम्ही होऊ शकतात कोट्याधीश
जर आपण या योजनेची माहिती घेतली तर या योजनेमध्ये तुम्ही वार्षिक कमाल दीड लाख रुपये इतकी गुंतवणूक करू शकतात. या रकमेच्या माध्यमातून जर तुम्हाला करोडपती व्हायचे असेल तर तुम्हाला प्रत्येक वर्षाला तितकी रक्कम या योजनेत जमा करणे गरजेचे आहे.
जर याच रकमेचे जर तुम्ही प्रत्येक महिन्याच्या आधारावर विचार केला तर साधारणपणे तुम्हाला प्रत्येक महिन्याला बारा हजार पाचशे रुपये या योजनेत गुंतवणूक गरजेचे आहे. पीपीएफ योजनेचा परिपक्वता कालावधी हा पंधरा वर्षाचा असून यानंतर तुम्हाला ही योजना पाच वर्षाच्या स्वरूपात दोनदा वाढवता येऊ शकते.
म्हणजेच यामध्ये तुम्ही 25 वर्ष दीड लाख रुपये वार्षिक गुंतवणूक चालू ठेवणे गरजेचे राहील. सध्या या योजनेवर 7.1% व्याज दिले जात असून त्यानुसार जर तुम्ही आकडेवारी केली तर 25 वर्षात तुमचे 37 लाख 50 हजार रुपये यामध्ये जमा होतात. परंतु व्याजाच्या रूपात तुम्हाला 65 लाख 58 हजार 15 रुपये मिळतात.
अशाप्रकारे तुमची गुंतवलेली मुद्दल आणि त्यावर मिळणारे व्याज जर तुम्ही एकत्रित केले तर 25 वर्षानंतर तुम्ही पीपीएफ मधून तब्बल एक कोटी तीन लाख आठ हजार पंधरा रुपये मिळवू शकतात. तुम्ही पंचवीस वर्षात अशा पद्धतीने या योजनेच्या माध्यमातून करोडपती होऊ शकतात.
जर तुम्ही महिन्याला 40 ते 50 हजार रुपये पगार किंवा तुमचे व्यावसायिक उत्पन्न असेल तर तुम्ही या योजनेत प्रत्येक महिन्याला साडेबारा हजार रुपये देखील गुंतवू शकतात व इतके उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीला हे कठीण नाही. अशा पद्धतीने तुम्ही महिन्याला साडेबारा हजार किंवा वर्षाला दीड लाख रुपये गुंतवून वर्षात स्वतःला करोडपती बनवू शकता.