आर्थिक

Investment Schemes : SBI आणि HDFC पेक्षा ‘या’ योजनेत मिळत आहे सर्वाधिक व्याज, गुंतवणूक केल्यास होईल हजारोंचा फायदा

Investment Schemes : अलीकडच्या काळात वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. तुम्ही खासगी किंवा सरकारी योजनेत गुंतवणूक करू शकता. ज्या योजनेत सर्वात जास्त व्याज मिळेलत्या योजनेत गुंतवणूक करण्याकडे अनेकांचा कल असतो.

परंतु गुंतवणूक करण्यापूर्वी या योजनेची तुम्हालापूर्ण माहिती असावी. नाहीतर तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो. SBI, ICICI आणि HDFC बँकेपेक्षा ही योजना सर्वात जास्त व्याज देत आहे. तुम्ही त्यात गुंतवणूक केल्यास तुम्हाला हजारोंचा फायदा होईल.

हे लक्षात घ्या की एफडीवरील व्याजदर हे सर्व बँकांचे वेगवेगळे असते. एसबीआय, आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँकेच्या तुलनेमध्ये पोस्ट ऑफिस आरडीचे व्याजदर सर्वात जास्त आहे. आरडी योजनेवर सर्वाधिक व्याज कोण देते ते जाणून घेऊयात.

पोस्ट ऑफिस आरडी योजना व्याजदर

वास्तविक पोस्ट ऑफिस आरडी योजनेचा कार्यकाळ उघडण्याच्या तारखेपासून 5 वर्षे निश्चित केला आहे. पूर्ण मुदतवाढीच्या वेळी लागू होणारे व्याजदर खाते प्रथम चालू केल्यांनतर सारखेच असतील. यामध्ये या तिमाहीसाठी प्रस्तावित व्याज दर 6.5 टक्के इतका आहे.

एसबीआय आरडी योजना व्याजदर

SBI च्या वेबसाइटनुसार, सामान्य आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी RD योजनेवरील व्याज FD प्रमाणेच असून समजा गुंतवणूकदाराने जर सलग 6 हप्ते बँकेत भरले नाही तर त्यांचे खाते लवकरात लवकर रद्द केले जाते. उरलेली रक्कम खातेदाराला देण्यात येते. 1 वर्ष ते 2 वर्षांच्या कालावधीसाठी बँकेकडून गुंतवणूकदाराला 5.10 टक्के दराने व्याज देण्यात येत आहे.

2 वर्षे ते 3 वर्षांच्या कालावधीसाठी, RD योजनेवर 5.20 टक्के दराने व्याजदर देण्यात येतो. ही बँक 3 वर्षे ते 5 वर्षे कालावधीसाठी 5.45 टक्के दराने व्याज देत असून बँक 5 वर्षे ते 10 वर्षे कालावधीसाठी आपल्या गुंतवणूकदारांना 5.50 टक्के दराने व्याज देत आहे. RD मध्ये, कमीत कमी कार्यकाळ 12 महिने आणि जास्तीत जास्त कार्यकाळ 120 महिने आहे.

ICICI बँक आरडी योजना व्याजदर

आयसीआयसीआय ही बँक आपल्या सर्वसामान्य ग्राहकांसाठी 4.75 टक्के ते 7.10 टक्के दराने व्याज देत आहे. तर वृद्धांसाठी 5.25 टक्के ते 7.50 टक्के दराने व्याज देत आहे. हे दर जानेवारीपासून लागू केले आहेत. ICICI बँकेच्या मतानुसार, आवर्ती ठेवी कमीत कमी 6 महिने ते जास्तीत जास्त 10 वर्षांच्या कालावधीसाठी दिल्या जातात.

एचडीएफसी बँक आरडी योजना व्याजदर

HDFC बँकेकडून 6 महिन्यांच्या कालावधीच्या RD साठी 4.50 टक्के व्याजदर देण्यात येतो. तर 9 महिने, 12 महिने आणि 15 महिन्यांच्या कालावधीवर ते अनुक्रमे 5.75 टक्के, 6.60 टक्के आणि 7.10 टक्के दराने व्याज देते. तसेच 24 ते 120 महिन्यांच्या कालावधीवर 7 टक्के दराने व्याज देण्यात येते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts