Investment tips : सर्वात अगोदर हे समजून घ्या की गुंतवणूक करण्यासाठी वयाची कोणतीही अट नसते. परंतु तुम्ही जितकी लवकर गुंतवणूक सुरू करू शकता, तितका जास्त परतावा तुम्हाला मिळेल. अशातच जर तुम्हाला करोडपती बनायचे असेल आणि तुमचे उत्पन्न कमी असेल तर काळजी करू नका.
आता तुम्ही 500 रुपयांची गुंतवणूक करू शकता. विशेष म्हणजे तुम्हाला या गुंतवणुकीवर तब्बल 60 लाख रुपयांचा परतावा मिळेल. परंतु जर तुम्ही गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागणार आहेत. जाणून घ्या करोडपती बनण्याचा सुलभ मार्ग.
समजा आता तुम्हाला केवळ म्युच्युअल फंडामध्ये SIP द्वारे प्रत्येक महिन्याला 500 रुपये जमा करायचे असेल तर चुकूनही हे चक्र कधीही खंडित करू नका. सलग 40 वर्षे प्रत्येक महिन्याला 500 रुपये SIP मध्ये टाकत राहावे. तर सेवानिवृत्तीपर्यंत तुमच्याकडे खूप मोठी रक्कम तयार होईल. हे लक्षात घ्या की मॅच्युरिटीवर तुम्हाला मिळालेली रक्कम पाहून तुमचा विश्वास बसणार नाही.
जाणून घ्या संपूर्ण गणित
समजा आता तुम्ही वयाच्या 20 व्या वर्षी सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे SIP द्वारे प्रत्येक महिन्याला 500 रुपये गुंतवायला सुरुवात केल्यास तर तुमची गुंतवणूक प्रत्येक वर्षी 6000 रुपये इतकी होईल. तुम्ही 40 वर्षांसाठी SIP मध्ये एकूण 2.40 लाख रुपये गुंतवाल.
या गुंतवणुकीवर, तुम्हाला प्रत्येक वर्षी एकूण 12% परतावा मिळतो, जो SIP मध्ये सहज उपलब्ध आहे, नंतर तुमचा मॅच्युरिटी होईपर्यंत एकूण परतावा रु 57,01,210 इतका असणार आहे. म्हणजे तुमची एकूण रक्कम 59,41,210 रुपये इतकी होईल.
तर तुम्ही पाहिलं असेल, संयमाने करण्यात आलेल्या गुंतवणुकीचा एक एक रुपया हळूहळू पैशाचा महासागर बनेल. 2.40 लाख रुपयांची गुंतवणूक 60 लाखांपर्यंत वाढेल यावर तुमचा लवकर विश्वासही बसणार नाही. मात्र एसआयपी आणि चक्रवाढ व्याजाच्या सामर्थ्याद्वारे गुंतवणूक केली तर तुमची छोटी रक्कम लाखांच्या फंडामध्ये बदलली असेल.
एकरकमी पैसे
आता तुम्ही एकरकमी म्युच्युअल फंडामध्ये 2.40 लाख रुपये ठेवल्यास तर तुम्हाला 40 वर्षांत इतका परतावा मिळेल की ज्याचा तुम्ही कधीच विचारही केला नसेल. 2.40 लाख रुपयांच्या एकरकमी गुंतवणुकीवर, तुम्हाला 12 टक्के दराने 2,20,92,233 रुपयांचा परतावा मिळणार आहे. एकंदरीतच मॅच्युरिटीवर तुमची एकूण रक्कम 2,23,32,233 रुपये इतकी होणार आहे.