Investment Tips : कोरोना काळानंतर सगळ्यांना बचतीचे महत्व समजले आहे. म्हणूनच बरेचजण सध्या बचतीकडे जास्त लक्ष देत आहेत, आणि कुठे न कुठे गुंतवणूक करत आहेत. पण बरेचजण असे आहेत जे जास्त प्रमाणात गुंतवणूक करू शकत नाहीत. म्हणूनच आज आम्ही त्यांच्यासाठी कमी पैशाचा उत्तम गुंतवणूक प्लॅन आणला आहे.
आजच्या या महागाईच्या काळात तुम्ही फक्त १०० रुपयांची गुंतवणूक करून देखील भविष्यात मोठा निधी तयार करू शकता. जर तुम्ही दररोज 100 रुपये वाचवायला सुरुवात केली तर एका महिन्यात तुमचे 3000 रुपये वाचतील. जर तुम्ही ही बचत रक्कम गुंतवायला सुरुवात केली तर तुम्ही काही वर्षांत लाखो रुपयांचा फंड तयार करू शकता आणि तुमचे स्वप्न पूर्ण करू शकता.
आज दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी एसआयपी ही उत्तम योजना मानली जाते. तुम्ही एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडात पैसे गुंतवता. म्युच्युअल फंड हे बाजाराशी जोडलेले असतात. यामध्ये परताव्याची कोणतीही हमी नाही, परंतु दीर्घकालीन गुंतवणुकीत सरासरी १२ टक्के परतावा मिळतो. जी आजच्या कोणत्याही योजनेपेक्षा जास्त आहे. जर तुम्ही SIP द्वारे म्युच्युअल फंडात दरमहा 3,000 गुंतवले तर 15 वर्षात तुम्ही 5,40,000 गुंतवाल, परंतु 12 टक्के दरानेही तुम्हाला त्यावर जवळपास दुप्पट परतावा मिळेल.
12 टक्के व्याजाने, तुम्हाला 15 वर्षात 9,73,728 रुपये व्याज म्हणून मिळतील. अशा प्रकारे, तुमचे गुंतवलेले पैसे आणि व्याजाच्या रकमेसह तुम्हाला एकूण 15,13,728 मिळतील. या रकमेतून तुम्ही चांगली कार सहज खरेदी करू शकता. याशिवाय, जर तुम्ही ती आणखी 5 वर्षे चालू ठेवली, म्हणजे 20 वर्षांसाठी एसआयपीमध्ये 3,000 रुपये गुंतवत राहिल्यास, 20 वर्षांनंतर तुम्हाला 29,97,444 रुपये मिळतील.
आर्थिक नियम सांगतो, तुम्ही तुमच्या उत्पन्नाच्या २० टक्के बचत केली पाहिजे. तुम्ही दरमहा 20,000 रुपये कमावत असाल तर, तुम्ही 20 टक्के दराने दरमहा 4,000 रुपये वाचवले पाहिजेत. असे केल्यास तुम्ही भविष्यात नक्कीच तुमचे श्रीमंत होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकता.