Investment Tips : अनेकांना गुंतवणूक सुरू करायची असते, पण गुंतवणूक कुठे करावी, कशी सुरुवात करावी अशा अनेक प्रश्नांची उत्तरे ते शोधत राहतात. नवे वर्ष नुकतेच सुरू झाले आहे. अशात तुम्हालाही नवीन वर्षात छोट्या बचतीतून मोठा फंड बनवायचा असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी गुंतवणुकीच्या काही टिप्स घेऊन आलो आहोत, ज्याचा वापर करून तुम्ही करोडपती देखील बनू शकता.
गुंतवणूक करण्यापूर्वी कधीही योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. जर तुम्ही दररोज सुमारे 170 रुपयांची बचत केली तर तुम्हाला एका महिन्यात सुमारे 5100 रुपये वाचवाल, जे पीएफ, म्युच्युअल फंड किंवा मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करून तुम्ही दीर्घ मुदतीत मोठा निधी गोळा करू शकाल.
गुंतवणुक करण्यापूर्वी, तुम्हाला त्याच्याशी निगडीत जोखमींची माहिती असणे फार गरजचे आहे. उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीच्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करता तेव्हा फक्त अल्पकालीन नफा किंवा उच्च परतावा शोधू नका. त्यापेक्षा अनेक शेअर्स दीर्घ मुदतीत चांगला परतावा देतात. अल्पावधीत धोकाही खूप जास्त असतो.
यासोबतच हेही लक्षात ठेवले पाहिजे की, सर्व पैसे एकाच ठिकाणी कधीही गुंतवू नका. तुम्हाला वेगवेगळ्या पर्यायांमध्ये गुंतवणूक करून तुमची जोखीम कमी करावी लागेल.
कोटींचा निधी कसा तयार करणार?
वीस वर्षांसाठी दरमहा किमान 5000 हजार रुपये गुंतवल्यास 1 कोटी रुपयांचा निधी मिळू शकतो. गुंतवणूकदारांकडे म्युच्युअल फंड, पीपीएफ, एफडी असे गुंतवणुकीचे पर्याय आहेत. ज्यामध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करून मोठा निधी गोळा केला जाऊ शकतो.
गुंतवणुकीसाठी सर्वात सुरक्षित पर्याय म्हणजे एफडी. ज्यामध्ये बाजारातील जोखीम समाविष्ट नाही. तुम्हाला यात दरमहा पाच हजार रुपये म्हणजेच वार्षिक 60 हजार रुपये गुंतवावे लागतील.
तुम्ही सतत दहा वर्षे गुंतवणूक केल्यास तुम्हाला ६ लाख रुपये गुंतवावे लागतील. जर तुम्हाला या गुंतवणुकीवर 6.5 टक्के दराने व्याज मिळत असेल, तर मॅच्युरिटीच्या वेळी गुंतवणूकदाराला 11,26,282 रुपये मिळतील. आता ही रक्कम पुढील दहा वर्षांसाठी पुन्हा एफडीमध्ये ठेवा. यातून तुम्ही एक कोटी रुपयांचा निधी आरामात जमा करू शकाल.
SIP द्वारे करोडोंची कमाई
दरमहा 5,000 रुपयांची एसआयपी करूनही तुम्ही मोठा निधी तयार करू शकता. तुम्ही सलग दहा वर्षे प्रत्येक महिन्याला 5,000 ची गुंतवणूक केल्यास, तुम्हाला 6 लाख रुपयांच्या मूळ रकमेसह 13.9 लाख रुपयांचा परतावा मिळेल. तुम्ही ही गुंतवणूक पुढील दहा वर्षांसाठी केली तर तुमच्याकडे करोडो रुपयांचा निधी जमा होईल.